Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

....तर तुम्हाला असे सिनेमे काढण्याची वेळ आली नसती; धर्मवीर-2 वरुन संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्ला

मुंबई : धर्मवीर या चित्रपटाच्या यशानंतर आज 'धर्मवीर 2' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हे. यावर धर्मवीर 3 चित्रपटाची पटकथा मी लिहिणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला आहे. धर्मवीरांवर काल्पनिक कथेनुसार पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा तुम्ही शिवसेनेची प्रतिष्ठा जपली असती तर तुम्हाला असे सिनेमे काढण्याची वेळ आली नसती, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की,धर्मवीर आनंद दिघेंची व्याप्ती काय होती हे आम्हाला माहिती आहे. ते फडणवीसांना आणि एकनाथ शिंदेंना देखील माहित नाही. ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या मदतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या वर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण बाळासाहेब ठाकरेंचे जे महाराष्ट्रात पसरलेले लाखो लोक आहेत ते एकनाथ शिंदे यांना मानत नाहीत. त्यामुळे अशा सिनेमाच्या माध्यमातून एक नवीन प्रतिक निर्माण करायचे काम सुरु आहे.

Sanjay Raut on Eknath Shinde

संजय राऊत पुढे म्हणाले की, ते पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदेंपेक्षा राजन विचारे आणि अनेक लोक दिघे साहेबांच्या अत्यंत जवळ होते. आनंद दिघे हे निष्ठावंत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, पदाधिकारी होते. सर्वसामान्यांच्या मदतीला ते सतत पुढे जायचे. दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला. 'धर्मवीरांवर काल्पनिक कथेनुसार पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा तुम्ही शिवसेनेची प्रतिष्ठा जपली असती तर तुम्हाला असे सिनेमे काढण्याची वेळ आली नसती', असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

आनंद दिघे यांना आम्ही जास्त ओळखायचो. धर्मवीर यांचा एका सिनेमात त्यांचा मृत्यू दाखवलेला आहे. आता धर्मवीर 2 काढत आहेत, धर्मवीर 3 काढताय, धर्मवीर विचार काढताय. हे काय अमर अकबर अँथनी सिनेमा काढताय का? खरं म्हणजे त्यांनी गोलमाल वन, गोलमाल 2 आणि गोलमाल 3 असा सिनेमा यांच्यावर काढला पाहिजे, असा टोला देखील संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना लगावला.

देवेंद्र फडणवीसांवरही साधला निशाणा

देवेंद्र फडणवीस धर्मवीर 3 काढत आहेत. पण त्यांना काय धर्मवीर माहित आहेत? त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे. महाराष्ट्र लुटायला दिल्ली आणि गुजरातमधून जे नवीन अफजलखान आणि औरंगजेब येत आहे त्यांनी त्यांच्यावर सिनेमा काढला तर नक्कीच त्यांची चर्चा होईल, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली .

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+