बीडमधील खऱ्या आरोपींना पकडण्याची फडणवीसांंमध्ये हिंमत आहे का?, संजय राऊतांचा सवाल
Sanjay Raut on Devendra Fadanvis : महाराष्ट्राची परिस्थिती बिहार पेक्षाही वाईट आहे, परभणी आणि बीडमधील घटनेमुळे महाराष्ट्रात काय चालू आहे हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. राहुल गांधी यांनी काल परभणीत जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
पण न्यायाची गोष्ट करणारे राज्याचे मुख्यमंत्री यांचे राहुल गांधींच्या भेटीवरुन पित्त का खवळले, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी थेट खऱ्या आरोपींना अटक करून दाखवावे. केवळ न्यायाची गोष्टी करून चालणार नाही. फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून परभणी व बीडच्या मस्साजोगमध्ये जाऊन भेट दिली पाहिजे, कुटुंबियांना दिलासा दिला पाहिजे. परंतु, हे महाशय विधिमंडळात बोलताना परभणीच्या घटनेवरुन थेट खोटं बोलत आहेत, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

फडणवीस विधानसभेत खोटं बोलतात
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून परभणीत जायला पाहिजे, पण ते विधानसभेत खोटं बोलले आहेत.
भुजबळांच्या परदेश दौऱ्यावर केले विधान
राऊत म्हणाले की, छगन भुजबळ सारख्या नेत्याचा केवळ वापर केला गेला आहे. निवडणुका झाल्यात आता त्यांची गरज नाही. त्यामुळे ते आता परदेश दौऱ्यावर गेले काय अन् राज्यात राहिले काय, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
विरोधकांना डांबू शकता, पण गुंड साथीदारांना नाही
राऊत म्हणाले की, खोटे आरोप लावून तुम्ही विरोधकांना पकडून जेलमध्ये डांबू शकता. परंतु, तुमच्या समर्थक गुडांना तुम्ही कारवाई करणार नाही. अजित पवारांच्या उपस्थितीत लोकांनी मागणी केली की, एका मंत्र्यांची हकालपट्टी करा. मग, तुमच्या मंत्रिमंडळात गुंडप्रवृत्ती व आरोपींना दिलासा देणारे मंत्री आहेत त्यांना का बाहेर काढत नाही. केवळ न्यायाच्या गप्ता मारून कसं चालणार आहे, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.
बिहारपेक्षाही वाईट महाराष्ट्राची अवस्था
राहुल गांधी यांनी काल परभणीत जाऊन जी भेट घेतली त्यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते की, महाराष्ट्रात काय चाललंय हे देशाच्या पातळीवर पसरलेले आहे. बीडमधील खऱ्या आरोपींना पकडण्याची फडणवीस यांच्यामध्ये हिमत आहे का?, असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केला.












Click it and Unblock the Notifications