धारावीचा भुखंड अदानीच्या घशात घालण्यासाठी वर्षा बंगल्यावर सौदा सुरु संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
धारावीचा भुखंड अदानीच्या घशात घालण्यासाठी वर्षा बंगल्यावर सौदा सुरु असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार तथा नेते संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावर बोलताना गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले ,धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईची लूट होऊ देणार नाही. धारावीचा भूखंड अडानीच्या घशात घालण्यासाठी वर्षा बंगल्यावर सौदा सुरू आहे. तो सौदा आम्ही होऊ देणार नाही.

आमचं सरकार आल्यावर धारावीच टेंडर रद्द करू अस उद्धव ठाकरे यांनी सांगितल आहे. धारावीबाबत आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. धारावी लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालू देणार नाही.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली . राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये चक्रव्यूहाची काय अवस्था झाली ते आपण पाहिलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याकडे महाराष्ट्र फार गांभीर्याने पाहत नाही. अनिल देशमुख यांनी जो खुलासा केलेला आहे. त्या खुलासावर उत्तर देण्यासाठी तुरुंगातील एका गुन्हेगाराची मदत प्रवक्ता म्हणून देवेंद्र फडणवीस घेत असल्याची टीका देखील संजय राऊत यांनी केली.
म्हणूनच आमचे सरकार पाडले
अनिल देशमुख यांनी काल एक मुद्दा मांडला. तो अत्यंत महत्वाचा आहे. चांदीवाला आयोगाचा अहवाल तुम्ही का उघड करत नाही. 11 महिने या आयोगाची सुनावणी झाली. हा चौदाशे पानांचा अहवाल आहे. या अहवालामध्ये अत्यंत स्फोटक माहिती आहे. ही स्फोटक माहिती बाहेर येण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचं आमदार फोडले आणि सरकार पाडलं.
हा अहवाल सादर जो केलाय तो त्यांनी जाहीर करावा. लपवून का ठेवला आहे. तुम्ही सगळ्यात आधी तो अहवाल जाहीर करा. मग तुमचे ते तुरुंगातील प्रवक्ते आहेत ते काय बोलतील त्यावर आम्ही उत्तर देऊ. देवेंद्र फडणवीस हे राजकारणातलं कच्चा लिंबू आहेत. अहवाल सादर झाल्यावर पुढील 10 - 12 दिवसात आमचं सरकार त्यांनी पाडलं. ते त्यासाठीच पाडलं कारण अहवाल सादर केला जाऊ नये म्हणून. अत्यंत स्फोटक माहिती त्याच्यामध्ये आहे,असेही संजय राऊत म्हणाले.
पवार- शिंदे भेट
दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. धारावी प्रकल्प आणि शिंदे-पावर भेटीचा काही संबंध आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांना दिल्ली येथे विचारला राऊत म्हणाले की, ते तुम्ही शरद पवार यांना विचारा. ते कशासाठी भेटले हे मला सांगता येणार नाही. ते अनेक विषयांसाठी भेटले अशी माहिती आहे.
त्यांचं राजकारण मॅच फिक्सिंग वर
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज सोलापूरात पत्रकार परिषद झाली. यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राज्याची परिस्थिती मणिपूर सारखी होईल अशी भीती व्यक्त केली होती.याबाबत ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे असे विधान केले.
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाना साधला. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्यांनी राजकारणत परत नव्याने सुरुवात केली आहे. ते दरवर्षी नव्याने राजकारणाची सुरुवात करतात. त्यांचं राजकारण मॅच फिक्सिंगवर सुरू असते.












Click it and Unblock the Notifications