महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी फडणवीस सरकार देणार जनतेला मोठ्ठं गिफ्ट! नाशिकहून मुंबईला पोहचा 3 तासांत
Samruddhi Highway Phase 3 Completed : देवेंद्र फडणवीस सरकार राज्यातील जनतेला येत्या एक मे रोजी मोठ्ठ गिफ्ट देणार आहेत. महाराष्ट्राच्या दळणवळणात आणि विकासात मोठी भूमिका बजावणारा महत्वाकांक्षी समृद्धी महामार्ग पुर्ण क्षमतेने आता सेवेत येणार आहे.
मुंबईला जोडणाऱ्या तिसरा आणि महत्वाचा इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा पुर्ण झाला आहे. याचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यामुळे नाशिक ते मुंबई हा प्रवास अवघ्या तीन तासांवर येणार आहे,तर मुंबई - नागपूर हा प्रवास आठ तासांत गाठता येणार आहे.

सुमारे 55 हजार कोटी रुपये खर्चून हा महत्वाकांक्षी प्रकल्प एमएमआरडीएने समृद्धी महामार्गाचा साकारला आहे. आतापर्यंत 625 किमीचा हा महामार्ग पुर्ण झाला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
701 किमीच्या महामार्गाचे काम पुर्ण
समृद्धी महामार्ग एकूण 701 किलोमीटरचा आहे. या महामार्गाचे काम तीन टप्प्यात पुर्ण झाले. या महामार्गातील शेवटचा टप्पा इगतपूरी-आमण - भिवंडी याचे काम गेल्या काही महिन्यांपासून जलदरित्या सुरु होतो. हे काम मार्चअखेर पुर्ण होईल अशी आशा होती पण काही दिवस विलंब झाला. आता या मार्गावर येत्या एक मेपासून वाहतूक सुरु होणार आहे.
नाशिक ते मुंबई प्रवास 3 तासांत
समृद्धी महामार्गाचे पुर्ण नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे आहे. नागपूर ते मुंबई असा हा प्रकल्प महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गाचे काम पुर्ण झाल्यानंतर आता नागपूर ते मुंबई हे अंतर अवघ्या 8 तासांत गाठता येणार आहे तर नाशिककरांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई ते नाशिक हे अंतर अवघ्या तीन तासांवर आले आहे.
समृद्धी महामार्ग आणि महत्वाचे टप्पे
- 2019 पर्यंत, भूसंपादन आणि निधीसह सर्व औपचारिकता, जलदगतीने पूर्ण करून, बांधकामाचा टप्पा निश्चित करून प्रकल्पाला लक्षणीय गती मिळाली.
- 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते शिर्डी जोडणारा पहिला 520 किमीचा टप्पा उघडण्यात आला आणि प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला.
- शिर्डी आणि इगतपुरी दरम्यानचा अतिरिक्त 80 किमीचा दुसरा टप्पा मे 2023 मध्ये उद्घाटन करण्यात आला. इगतपुरी ते मुंबईला जोडणारा अंतिम टप्पा 701 किमीचा मार्ग पूर्ण करेल आणि नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास सुमारे आठ तासांवर कमी करेल.
- धोरणात्मकरित्या डिझाइन केलेले, एक्सप्रेसवे 10 प्रमुख जिल्ह्यांना कापतो आणि अप्रत्यक्षपणे आणखी 14 जोडतो, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आर्थिक कनेक्टिव्हिटी वाढते.
- रस्त्याचे संरेखन मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर आणि आगामी नवी मुंबई विमानतळासारख्या प्रमुख केंद्रांशी देखील जोडते. त्याचे 24 इंटरचेंज औद्योगिक केंद्रांना जोडतात, ज्यामुळे हा एक आर्थिक कॉरिडॉर बनतो ज्यामुळे विकासाला चालना मिळेल आणि राज्यासाठी संधी खुली होतील अशी अपेक्षा आहे.
- पारंपारिक महामार्गांप्रमाणेच, या प्रकल्पामध्ये मार्गावर 30-40 किमी अंतराने टाउनशिप विकास समाविष्ट केला आहे, ज्यामध्ये शैक्षणिक, आरोग्य सेवा आणि मनोरंजन सुविधा असलेल्या 18 टाऊनशिपचा समावेश आहे ज्याचा उद्देश समुदायाच्या वाढीला चालना देणे आणि ग्रामीण-शहरी असमानता कमी करणे आहे.












Click it and Unblock the Notifications