Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Sambhaji Maharaj Punyatithi 2025: संभाजी महाराज यांच्या जीवनातील 10 प्रेरणादायी प्रसंग, जाणून घ्या

Chhatrapati Sambhaji Maharaj Death Anniversary 2025 : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अर्थात शंभूराजे यांची आज शनिवारी दि.29 मार्च 2025 पुण्यतिथी आहे. त्यांची पुण्यतिथी ही बलिदान दिन म्हणून देखील स्मरण केली जाते. त्यांना प्रेमाने सर्व जण शंभूराजे असे देखील म्हणत. शंभूराजे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन. संभाजीराजे यांच्या जीवनाबाबतचे प्रसंग आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा,

शत्रूही नतमस्तक होई जिथे, असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा!

छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!

चला तर जाणून घेऊया छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाशी संदर्भीत विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया...!

Sambhaji Maharaj Punyatithi 2025

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला, बालपण कसे गेले?

  • छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.
  • संभाजी महाराजांच्या आई, महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ ही स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केला.
  • त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. मात्र त्यांंची सावत्र आई सोयराबाई यांनी संंभाजी महाराजांना पोरकेेेपणाने वागवले तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला.
  • अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते.
  • मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे 9 वर्षाचे होते.
  • छत्रपती शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले.
  • मुघल सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.

संभाजी महाराज यांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला होता?

अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे छत्रपती संभाजी महाराज हे उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.

हे ही वाचा : छत्रपती संभाजी महाराजांच्या या 4 गोष्टी तुमच्या मुलांना नक्की सांगा; संस्कार आणि पराक्रम आपोआप कळेल

संभाजी महाराजांनी किती किल्ले जिंकले?

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज महान योद्धा होते. शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती बनले. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी संभाजी महाराजांनी पहिलं आणि 32व्या वर्षी अखेरचं युद्ध लढलं. आपल्या नऊ वर्षाच्या शासन काळात संभाजी महाराजांनी 120 लढाया लढल्या होत्या.

संभाजी महाराजांना किती भाषा येत होत्या?

ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी संभाजी महाराज हे केवळ सर्वात क्रूर योद्ध्यांपैकी एक नव्हते, तर ते १३ भाषांमध्ये बोलू शकत होते. त्यांनी संस्कृतमध्ये पुस्तके लिहिली आहेत, सर्व मुघलांपेक्षा ते फारसी चांगले बोलू शकत होते, हिंदी आणि ब्रज भाषेत कविता लिहिल्या आहेत, पोर्तुगीज, अरबी, कन्नड, इंग्रजी इत्यादी भाषा बोलू शकत होते.

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसूबाई चे काय झाले?

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 12 मार्च 1689 रोजी त्यांचे धाकटे भाऊ राजाराम यांना छत्रपती करण्यात आले. त्यानंतर 13 दिवसांनी म्हणजेच 25 मार्च 1689 रोजी मुघल सैन्याने रायगड किल्ल्यावर हल्ला केला. रायगडचा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला आणि त्याने संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाई आणि मुलगा शाहू यांना कैद केले.

Take a Poll

संभाजी महाराजांचा मुलगा कोण?

संभाजी महाराजांची विधवा येसूबाई, मुलगा शाहू आणि शिवाजी महाराजांची विधवा सकवरबाई यांना कैद करण्यात आले; सकवरबाईंचा मुघल कैदेत मृत्यू झाला. पकडले गेले तेव्हा सात वर्षांचे असलेले शाहू फेब्रुवारी 1689 पासून 1707 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत 18 वर्षे मुघलांच्या कैदेत राहिले.

हे ही वाचा : Sambhaji Maharaj Punyatithi 2025 : प्रेरणादायी मेसेज, कोट्स पाठवून शंभूराजांना करा त्रिवार अभिवादन!

संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला?

ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संभाजी महाराजांनी वयाच्या 14 व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला, ग्रंथाचे नाव - बुधभुषणम. संभाजी महाराजांनी अजून 3 ग्रंथ लिहिले. नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक.

छत्रपती संभाजी महाराज यांना कोणी पकडून दिले?

जातीसाठी इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नका. गणोजी शिर्के या गद्दार मराठ्यानेच संभाजी महाराज यांना पकडून दिले, प्रत्येक इतिहासकाराने हे मान्य केले आहे.

गणोजी आणि कान्होजी कोण होते?

पिलाजी शिर्के हे वंशाचे नेते होते आणि गणोजी व कान्होजी हे त्यांचे पुत्र होते. पिलाजी यांची मुलगी येसूबाई यांचा विवाह छत्रपती संभाजी महाराजांशी; तर गणोजी यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या राजकुंवर यांच्याशी झाला होता.

गणोजी शिर्के कोण होते?

गणोजीराव शिर्के हे महाराणी येसूबाईसाहेबांचे बंधू आणि छत्रपती संभाजी महाराजांचे भाऊ पिलाजीराव शिर्के यांचे धाकटे पुत्र होते. त्यांची शहरे मंत्रिपदाची सत्ता छत्रपती संभाजी महाराजांनी घेतली होती, त्यांनी मुकरब खानला संभाजीचे स्थान सांगून मदत केली ज्यामुळे त्याला पकडण्यात आले आणि त्याला फाशी देण्यात आली.

धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय?

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि धर्मासाठी दिलेलं बलिदान अनमोल आहे. औरंगजेबाने महाराजांना बंदी करून त्यांना 40 दिवस अत्यंत क्रूर यातना दिल्या, ज्याचा परिणाम म्हणून आज 28 फेब्रुवारीपासून धर्मवीर बलिदान मास पाळला जातो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+