Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Sambhaji Maharaj Punyatithi 2025 : प्रेरणादायी मेसेज, कोट्स पाठवून शंभूराजांना करा त्रिवार अभिवादन!

Chhatrapati Sambhaji Maharaj Death Anniversary 2025 : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अर्थात शंभूराजे यांची शनिवारी दि.29 मार्चला पुण्यतिथी आहे. त्यांची पुण्यतिथी ही बलिदान दिन म्हणून देखील स्मरण केली जाते. त्यांना प्रेमाने सर्व जण शंभूराजे असे देखील म्हणत. शंभूराजे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन. त्यांचे प्रेरणादायी विचार व संदेश तुम्ही व्हाट्सअप, इंन्स्टाग्रामद्वारे तुम्ही पाठवून त्यांच्या बलिदानाचे स्मरण करा अन् आपल्या राजांना अभिवादन करा..

संभाजीराजे भोसले यांचा वारसा भारतीय इतिहासाच्या पानांमध्ये खोलवर रुजलेला आहे, विशेषतः मराठा साम्राज्याच्या मुघल साम्राज्याविरुद्धच्या संघर्षाच्या संदर्भात. छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र म्हणून, त्यांना केवळ सिंहासनाचा वारसा मिळाला नाही तर वाढत्या मराठा साम्राज्याची मूल्ये आणि अखंडता राखण्याची जबाबदारी देखील मिळाली.

त्यांचा बलिदान दिवस किंवा पुण्यतिथी दरवर्षी मराठी कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो. 2015 मध्ये छत्रपती संभाजी राजे भोसले यांची पुण्यतिथी 29 मार्च आहे. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, 11 मार्च 1689 रोजी मुघलांशी लढताना त्यांचा मृत्यू झाला..

Sambhaji Maharaj Punyatithi 2025

1. शृंगार होता संस्कारांचा
अंगार होता हिंदवी,
स्वराज्याचा, शत्रूही नतमस्तक होई जिथे,
असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा
छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!

Sambhaji Maharaj Punyatithi 2025

2. पाहुनी शौर्य तुजपुढे
मृत्यूही नतमस्तक जाहला
स्वराज्याच्या मातीसाठी
शंभु अमर जाहला
संभाजी महाराजांना पुण्यतिथी विन्रम अभिवादन!

हे ही वाचा : Shiv Jayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराजांचे 10 प्रेरणादायी विचार, जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील!

3. रूद्राचा अवतार
वाघाचा ठसा होता
अरे, सह्याद्रीला विचारा त्या
माझा शंभूराजा कसा होता!

Sambhaji Maharaj Punyatithi 2025

5. इतिहासात एक पराक्रमी योद्धा,
राजकारणीस साहित्यिक व रसिक
असं मिश्रण एकाच राजाच्या नशिबी आलं
ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे!
छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!

Sambhaji Maharaj Punyatithi 2025

महत प्रतापी शिवरायांचा
शूरवीर छावा, वंदन करितो बलिदानाला
जय 'शंभूराया' छत्रपती संभाजी महाराज यांना
पुण्यतिथि निमित्त कोटी कोटी प्रणाम!

हे ही वाचा : Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi : जाणून घ्या- अजिंक्य शंभूराजांचा पराक्रमी इतिहास!

संभाजीराजे यांचा मृत्यू कसा झाला!

संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने घातली. मात्र, संभाजी राजेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे ठार मारायचा आदेश दिला. सुमारे 40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजीराजांची भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे त्यांची प्राणज्योत मालवली...

Take a Poll

या पराक्रमी राजाला विनम्र अभिवादन

अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+