खलनायक घरी बसला, कुत्र्याच्या छत्र्याप्रमाणे आता आंदोलनाच्या छत्र्या; सदाभाऊंची शरद पवारांवर टीका

Sadabhau Khot Attack on Sharad Pawar : देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नेते आहेत. तेच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य आहेत. त्यांना केंद्रातील नेत्यांचा पाठिंबा आहे.प्रस्थापितांच्या बुडाला जाळ लावण्याचे काम देवा भाऊ यांनी केले आहे आहे.

महाराष्ट्राचा खरा खलनायक जनतेने घरी बसवला आहे. जश्या पावसाळ्यात कुत्र्‍याच्या छत्र्‍या येतात, अगदी तशाच आंदोलनाच्या छत्र्‍या पुढे येणार आहे, असे म्हणत रयत क्रांती सेनेचे प्रमुख तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली.

Maharashtra Assembly Election 2024

सदाभाऊ खोत म्हणाले, मराठा समाजाला सर्वात जास्त कोणी दिले असेल तर ते भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले असेल. मराठा समाजासाठी जे जे करता येईल ते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. जशा कुत्र्याच्या छत्र्या पावसाळ्यात येतात तशा छत्र्या आंदोलनाच्या येतात. तसेच महाराष्ट्राच्या खलनायकाला लोकांनी घरात बसवले आहे.

सदभाऊ खोत यांची नाना पटोलेंवर टीका

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करताना सदभाऊ खोत म्हणाले, तंत्रज्ञान यायची सुरुवात झाली ती राजीव गांधी यांच्या काळामध्ये. ईव्हीएम हे सुद्धा काँग्रेसने आणले होते. आता तेच तंत्रज्ञानाला विरोध करत आहेत. तुम्हाला पुढची पिढी अडाणी ठेवायची आहे का? तुम्ही जिंकला की तुम्हाला चांगले वाटते आणि हरला की तुम्ही ईव्हीएमला दोष देतात.

घरातल्या मायमाऊलींचा सर्व्हे केला नाही

पुढे बोलताना सदभाऊ खोत म्हणाले, या मशीनला बोलता येत नाही, चालता येत नाही म्हणून तुम्ही त्याला दोष देतात. महाविकास आघाडी ही सरदारांची आघाडी, जे सर्व्हे केलेत ते रस्त्यावरती लोकांचे सर्व्हे केले. मात्र घरातल्या माय माऊलींचा सर्व्हे केला नाही. कारण ते घरात जेवत नाहीत, बाहेर जेवतात, असा टोला सदभाऊ खोत यांनी नाना पटोले यानं लगावला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+