OneIndia Exclusive : लाडकी बहीण योजनेबद्दल रोहित पवार म्हणतात, महाविकासआघाडी सत्तेत आल्यास...
पुणे - राज्यात विधानसभा निवडणुकीला अवघ्या २ महिन्यांचा कालावधी उरलेला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकासाठी रणनिती आखली जात आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला चांगलं यश मिळालं.
आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची रणनिती काय आहे?, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात काही गट तट आहेत का?, अजित पवार पुन्हा शरद पवारांसोबत येणार का? या आणि अशा अनेक प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी वन इंडिया मराठीसोबत खास बातचीत केली.

महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे वारं फिरलय का? असा प्रश्न रोहित पवारांना विचारला असता त्यांनी या योजनेमुळे आगामी निवडणुकीवर कुठलाही परिणाम होणार नसल्याच म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे महाविकासआघाडीची सत्ता आल्यास या योजनेची व्याप्ती वाढवली जाईल असं आश्वासन रोहित पवार यांनी यावेळी दिलं.
ते पुढे म्हणाले, या योजनमुळे महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत. आपल्या मुलांच्या हाताला काम मिळावं, त्यांना रोजगार मिळावा अशी महिलांची मागणी आहे. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांना ५-५ दिवस रांगेत उभं रहाव लागलं. फॉर्म भरतानाही बरीच अडचण आली असा रोहित पवार यांनी यावेळी केला.
फडणवीसांनीच मराठा आरक्षणात खोडा घातला: पवार
मराठा आरक्षणाचे खरे विरोधक देवेंद्र फडणवीस आहेत असा आरोप करत रोहित पवार म्हणाले की, मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्याने याचिका दाखल केली आहे. गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्ते आहेत. देवेंद्र फडणवीस हे देवमाणून असल्याच विधानही सदार्वते यांनी केलं होतं. यामुळे सदावर्तेंच्या माध्यमातून फडणवीसांनी मराठा आरक्षणात अडथळा आणल्याचा आरोप पवारांनी केला.
अजितदादांचा गेम झाला का? रोहित पवार म्हणतात..
लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही. या अपयशाच खापर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अजित पवारांवर फोडलं होतं. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांमधूनही अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अशी आग्रही मागणी झाली होती. यामुळे अजित पवारांचा गेम झालाय अशा प्रतिक्रिया लोकांमधून उमटत आहेत.
यावर रोहित पवार म्हणाले, अजितदादांचा गेम झालाय असेच म्हणावे लागेल. अजित पवार मोठे आहेत. लोकनेते आहेत. मात्र आपला विचार सोडून भाजपबरोबर गेल्याने लोकांनी अजितदादांना नाकारले आहे. जागावाटपामध्येही अजितदादांच्या वाटेला २५ ते ३० जागा येतील असा दावा रोहित पवारांनी यावेळी केला.
राजकीय सल्लागारांना अजित पवारांनी २०० कोटी रुपये दिले
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांनी निवडणूक रणनितीसाठी मोठा खर्च केल्याचे बोलले जात आहे. याबाबत रोहित पवार म्हणाले, अजितदादांनी काय घालाव, कसं रहाव, कुठे जावं, काय बोलावं हे आता काही लोकं ठरवणार आहेत. यासाठी पॉलिटिकल कन्सल्टंटला २०० कोटी रुपये दिल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. तसेच यामुळे त्यांना फार मोठा फायदा होणार नसल्याचा टोलाही रोहित पवारांनी लगावला.












Click it and Unblock the Notifications