भाजपच्या दृष्टीने मित्रपक्ष म्हणजे तात्पुरती सोय, आधी शिंदेंचे पंख छाटले, आता दादांची पाळी..!

सत्ता स्थापनेपासूनच महायुती सरकारमध्ये आलेबल नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. मंत्रिपदाच्या वाटण्यापासून ते पालकमंत्रीपदासाठी असलेली चुरस देखील पाहायला मिळाली. तर दुसरीकडे महायुतीचे वरिष्ठ नेते आमच्यात कोणताही वाद नसल्याचा दावा करतात. परंतु, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्यातच दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्यांकडून लुडबूड म्हणा घुसखोरी सुरू झाली आहे, असा दावा शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्टवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अडीच वर्षातील निर्णयांचा आढावा घेत एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये घुसखोरी केली, आता अजित पवारांचा नंबर असल्याचे रोहित पवार यांचा नंबर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार हे पद निर्माण केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.

Rohit Pawar

रोहित पवारांनी X पोस्टमध्ये काय केला दावा?

"मुख्यमंत्र्यांनी 'मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार' हे राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले पद निर्माण करून एकप्रकारे अजितदादांच्या अर्थखात्यात देखील घुसखोरी केलेली आहे. यापुढे अर्थ खात्याचे सर्वच धोरणात्मक निर्णय आणि पर्यायाने सर्वच प्रशासकीय निर्णय सुद्धा मुख्य आर्थिक सल्लागारांच्या पर्यायाने मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतील.

आधी एकनाथ शिंदेंच्या खात्यात घुसखोरी..

गेल्या अडीच वर्षात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदे साहेबांच्या खात्यांमध्ये घुसखोरी केली आता अजितदादांचा नंबर आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिला असल्याने त्यांनी प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष-अपत्यक्षपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला असून मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय देखील त्याच कार्यप‌द्धीचा भाग आहे.

लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण आणि टीम वर्कचा रिझल्ट नेहमीच केंद्रीकृत सत्तेपेक्षा चांगला राहिला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणे महाराष्ट्राच्या हिताचे राहील," असे रोहित पवावर म्हणाले.

भाजपच्या दृष्टीने मित्रपक्ष म्हणजे 'तात्पुरती सोय'

"राहिला प्रश्न मित्रपक्षांचा, तर भाजपच्या शब्दकोशात मित्रपक्ष म्हणजे केवळ 'तात्पुरती सोय' एवढाच अर्थ आहे, त्यामुळे गरज संपताच तात्पुरती सोय देखील संपवायची ही भाजपची कार्यपद्धती आहे. भाजपची ही कूटनीती बाहेर राहून सर्वांना कळत असली तरी शिकार होणाऱ्या मित्रपक्षांना शिकार होईपर्यंत कळत नाही हे मात्र मित्रपक्षांचं दुर्दैव म्हणावं लागेल," असं रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+