संविधानात रक्तहीन क्रांतीची ताकद; CJI भूषण गवईंचे महाराष्ट्र विधिमंडळातील भाषण वाचा 5 मुद्द्यात!
CJI Bhushan gawai Speech in Mumbai : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक असलेल्या देशात सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावर काम करायला मिळत आहे. एका संवैधानिक पदावर काम करणे म्हणजे घटनेवर काम करणे अभिप्रेत असते. कारण, रक्तहीन क्रांती करण्याची ताकद केवळ संविधानात आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश भूषण गवई यांनी केले.
सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan gawai) यांचा आज महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ सभागृहात सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राचे भूमीपुत्र आज देशाचे सरन्यायाधीश बनले असल्याची बाब महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान वाढवणारी आहे, त्यामुळे राज्याच्या 13 कोटी जनतेच्या वतीने सभागृहात विधानसभा अध्यक्ष, उपसभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांच्या उपस्थितीत या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्यात सीजेआय भूषण गवई यांनी त्यांचे विस्तृत मनोगत व्यक्त केले. त्यांच्या भाषणातील 5 महत्त्वाचे मुद्दे कोणते, यावर आपण नजर टाकूया..!

(image Credit - महाराष्ट्र विधिमंडळ युट्यूब)
1) माझा हा शेवटचा सत्कार समारंभ!
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच सरन्यायाधीश (CJI) यांनी पहिल्या बाकावर उपस्थित सर्व मान्यवरांना अभिवादन केलं. माझा हा शेवटचा सत्कार समारंभ आहे, महाराष्ट्राच्या सर्व जनतेकडून हा सत्कार आहे. भारतीय राज्यघटना शालेय जीवनापासूनच माझ्या मनात रुजली आहे. तसेच, माझे वडील आणि या सभागृहाच नात वेगळं आहे, असे म्हणत त्यांच्या वडिलांनी 30 वर्षे सभागृहात गाजवल्याची आठवण देखील भूषण गवई यांनी यावेळी व्यक्त केली.
2) मी स्वत:ला राज्यघटनेचा विद्यार्थी समजतो!
मी नेहमीच स्वतःला भारतीय राज्य घटनेचा विद्यार्थी समजत आलो आहे, मी 10 वी मध्ये असताना माझ्यात राज्यघटना रुजली. विधी मंडळात माझ्या वडिलांचे 30 वर्षापेक्षा जास्त वर्षे प्रेमाचे नाते राहिले आहे, त्या विधी मंडळात माझा सत्कार हा न भुतो न भविष्यती असा क्षण आहे, असे म्हणत या सत्कार सोहळ्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
3) फेड्रलिजम जर आपण आणतोय तर ते फ्लेक्सिबल असले पाहिजे!
सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, डॉ. बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीयत्व असलेले व्यक्ती होते, ते म्हणायचे की मी पहिला आणि शेवटचा भारतीय आहे. जेव्हा केव्हा देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो तेव्हा देशासाठी आपण एकत्र आले पाहिजे. बाबासाहेबांना 1947 मध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आले, एक वर्षानंतर त्यांनी राज्यघटनेचा पहिला ड्राफ्ट सादर केला, बाबासाहेब म्हणाले माझ्या मते एकच घटना संपूर्ण देशासाठी चांगली आहे. आपला देश एकसंघ ठेवायचा असेल तर वन नेशन वन सिटीझन हे ठेवायला पाहिजे. फेड्रलिजम जर आपण आणतोय तर ते फ्लेक्सिबल असले पाहिजे, म्हणून जेव्हा केव्हा हा देश एकसंघ कसा राहील यासाठी घटनेत प्रॉव्हीजन केले आहे, अशी माहिती सरन्यायाधीशांनी दिली.
4) राज्यघटनेचे प्रमुख तीन स्तंभ!
भारतीय राज्य घटनेचे तीन स्तंभ आहेत, विधिपालिका न्याय पालिका आणि कायदेपालिका. राज्यघटनेनुसार कायदायचे पालन करण्याची जबाबदारी विधीपालिकेची आहे, न्याय व्यवस्था स्वतंत्र असावी दबाव तंत्रात नसावी ही भूमिका बाबासाहेब आंबेडकर यांची होती, असेही गवई यांनी प्रतिपादीत केले.
5) स्वातंत्र्य टिकवायचे तर जातीभेद बाजूला करावा लागेल!
स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर जातीभेद बाजूला ठेवून काम कराव लागेल. 75 वर्षांचा कालखंड हा संविधानासाठी मोठा नाही, सामाजिक न्याय व्यवस्थेत न्याय देणारं संविधान आहे. दोन महिला राष्ट्रपती झाल्या, दोन वेगवेगळ्या दलातील समुदायाच्या राष्ट्रपती झाल्याची आठवणही त्यांनी सांगितली.












Click it and Unblock the Notifications