Ratnagiri News : मुंबई गोवा मार्गावर मोठा अपघात! रत्नागिरीत जगबुडी नदीत कार कोसळून 5 ठार
Ratnagiri News : महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये एक मोठा अपघात घडला आहे. भरधाव कार जगबुडी नदीत कोसळून पाच जणांचा करुण अंत झाला आहे. हा अपघात खेडमध्ये जगबुडी नदीच्या पुलावर घडला. पुलावरुन कार जवळपास शंभर ते दीडशे फुट खोल कोसळली.
या अपघातात कार चालकाचा जीव बालंबाल बचावला असून तो गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच मदत पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तत्परता दाखवत कार नदीतून बाहेर काढली तसेच मृतांची ओळख पटवली जात आहे. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी येत बचावकार्य तसेच वाहतूक कोंडी सोडवली.

कार 100 फूट खाली कोसळली
मुंबई गोवा मार्गावर घडलेल्या अपघातात कार ज्यावेळी जगबुडी नदीच्या पुलावर आली त्यावेळी ती
शंभर फुट खाली नदीपात्रात कोसळली, या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला.
अंत्यसंस्कारासाठी जात होते प्रवासी
कारमधील प्रवासी हे मुंबईतून देवरुख येथे अंत्यसंस्कारासाठी जात होते, त्यावेळी हा अपघात घडला. अपघातानंतर कारचेही मोठे नुकसान झाले असून गंभीर जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहेत.
मिडिया रिपोर्टनुसार, पहाटे साधारण पाच वाजण्याच्या सुमारास जगबुडी नदीत कार कोसळल्याची ही घटना घडली. कार जगबुडी नदीवरुन जात असताना भरधाव वेगात होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
जवळास 100 ते 150 फूट खोल कार कोसळल्याने कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाला असून यासंबंधी अधिक तपशील येणे बाकी आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले असून या दरम्यान अपघातग्रस्त कार क्रेनच्या साहाय्याने वर उचलण्यात आली. त्यानंतर कारमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले.












Click it and Unblock the Notifications