रेशनकार्डच्या नियमात मोठा बदल! ई-केवायसी करा नाहीतर नवीन वर्षात होऊ शकते रेशनकार्ड रद्द!
Ration card rules change Do e-KYC : रेशनकार्ड ही अशी एक सुविधा आहे ज्यामुळे केंद्र सरकारच्या योजनेद्वारे अन्नधान्य मोफत मिळते याशिवाय पुरावा आणि आर्थिक स्तरासंदर्भात पुराव्याची पुर्तता होते. रेशनकार्डच्या नियमांत वेळोवेळी बदल होत आहेत आणि ते बदल वेळीच केले नाही तर अडचणी येतात बहुदा रेशनकार्ड बंदही होऊ शकते अशा स्थितीत रेशनकार्डच्या नियमातील बदल आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
80 कोटी कुटुंबाकडे आहे रेशनकार्ड
सरकारने नवीन वर्षात अनेक नियमात बदल केले आहेत, त्यात रेशन कार्डच्या संदर्भातील नियम देखील नवीन वर्षात बदलणार आहेत. शासकीय आकडेवारीनुसार देशातील जवळपास 80 कोटी कुटुंबांकडे रेशन कार्ड आहे. हे 80 कोटी कुटुंब रेशन कार्डवर दिल्या जाणाऱ्या धान्याचा लाभ घेत आहेत.

रेशनकार्डवर काय काय मिळते
केंद्र सरकारने अंत्योदय योजनेत मोफत धान्य देण्यास सुरुवात केली होती. कोरोना काळापासून धान्य वाटपात जास्तीचे धान्य देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर जास्त रेशन देण्याच्या या योजनेला मुदतवाढ दिली गेली. रेशन कार्ड धारकांना स्वस्त दरात रेशन दिले जाते. यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी अशा धान्यांचा समावेश असतो. तर सण-उत्सव काळात तेल, रवा आणि डाळीही दिल्या गेल्या आहेत, तर ज्या लोकांकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे त्यांना साखर सुद्धा मिळते. आधी रेशन कार्ड धारकांना रॉकलही दिले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून एलपीजीचा वापर वाढला असल्याने केरोसीन देणे बंद करण्यात आले आहे.
हेही वाचा : जुने आधारकार्ड अपडेट केलं नाही का? लवकर करा, तारीख वाढली! अपडेशन मोफत, या दिवसांपर्यंत आहे मुदत
ई-केवायसी करा नाहीतर रेशनकार्ड होईल रद्द
रेशनकार्डच्या नव्या नियमानुसार, नवीन वर्षात म्हणजे 2025 मध्ये काही रेशन कार्ड रद्द केले जाणार आहेत. सरकारने आता रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. ज्या नागरिकांनी ई-केवायसी केलेली नाही त्यांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते.
हेही वाचा : Aadhaar Pan Card Linking : आधार कार्डशी पॅन लिंक केले नाही? या स्टेप्स फाॅलो करा, काम होईल सोप्पे
ई केवायसीची तारीख 31 डिसेंबर 2024
रेशन कार्ड केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला ई-केवायसी करायची आहे. जर आज तुम्ही केव्हायसी ची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमच रेशन कार्ड बंद होऊ शकते. जे लोक दिलेल्या मुदतीत रेशन कार्ड ची केवायसी करणार नाहीत त्यांचे रेशन कार्ड एक जानेवारी 2025 पासून रद्द होऊ शकते. तर दुसरीकडे नवीन वर्षातही ई-केवायसी करण्यासाठी रेशनकार्ड धारकांना मुदवाढ दिली जाऊ शकते असेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : KYC न केल्यास रेशनकार्ड होणार बंद, नाही मिळणार धान्य; जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया
ई-केवायसी कशी करायची?
- रेशन कार्डची केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील स्वस्त धान्य दुकानात म्हणजेच रेशन दुकानात जावे लागणार आहे.
- रेशन दुकानात गेल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड द्यावे लागेल.
- कुटुंबात जेवढे सदस्य आहेत म्हणजेच रेशन कार्ड मध्ये ज्या सदस्यांची नावे आहेत, त्या सर्वांचे आधार कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागेल.
- त्यानंतर पोओएस मशीनवर फिंगरप्रिंट टाकावे लागेल म्हणजे तुमची ई- केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल.












Click it and Unblock the Notifications