KYC न केल्यास रेशनकार्ड होणार बंद, नाही मिळणार धान्य; जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया
Know online KYC process : सध्या शासकीय योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांना ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मग आधार असो, बँकचे खाते असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यावयाचा असो, प्रत्येक ठिकाणी ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे.
अशातच आता सर्वसामान्य नागरिकांकडे असणाऱ्या रेशनकार्डसाठीही ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. यासाठी असलेली एक नोव्हेंबरची अंतिम मुदत वाढवून एक डिसेंबर 2024 करण्यात आलीय. आता वेळेच्या आता लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी, अन्यथा त्यांना धान्य मिळणे बंद होणार आहे. चला तर जाणून घेऊया ई केवासी करण्याची प्रक्रिया.

ई-केवायसीसाठी मुदत वाढवली
सरकारने काही महिन्यांपूर्वी केसरी, पांढऱ्या व पिवळ्या रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी करण्याची मार्गदर्शक तत्वे लागू केली होती. त्यात सर्व रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी करणे अनिवार्य होते. त्यासाठी आता शेवटची तारीख डिसेंबर 2024 असणार आहे. प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आता ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.
विशेष म्हणजे शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तसे न केल्यास संबंधितांना धान्य वितरण सेवेचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
जर तुम्ही अजूनही तुमच्या रेशनकार्डाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर, तुमच्या परिसरात असलेल्या कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात जाऊन फोर-जी ईपॉस (pos) मशीनने ई-केवायसी करुन घेवू शकता, अन्यथा तुम्हाता रेशनकार्डावरुन कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही नुकतीच सरकारने ई-केवायसी केलेल्यांनाच रेशन मिळणार असल्याची घोषणा केली होती.
ई-केवायसी न केल्यास कार्ड होईल बंद
ई-केवायसीची शेवटची तारीख 30 सप्टेंबर होती. मात्र नंतर ती 1 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. आता मात्र अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. 1 डिसेंबरपर्यंत तुम्ही ई-केवायसी न केसल्यास तुम्हाता रेशन मिळणार नाही. तसेच रेशनकार्डामधून तुमची नावे काढून टाकली जावू शकतात. त्यातच आता सर्वसामान्य नागरिकांकडे असणाऱ्या रेशनकार्डसाठीही ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे.
दोन प्रकारे करा ई-केवायसी
दोन प्रकारे ई-केवायसी करता येते. पहिली म्हणजे रेशन दुकानात जाऊन, दुसरी ऑनलाईन. ज्या दुकानात धान्य मिळते तेथे ई केवायसी करण्याची सोय आहे. या रेशन दुकानात जाऊन फोर-जी ई-पॉस मशीन द्वारे केवायसी केली जाते. यानंतर संबंधित व्यक्तीच्या बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. ई-केवायसीसाठी आधार कार्ड घेऊन जावे लागणार आहे. ई-पॉस या मशीनमध्ये आधार क्रमांक टाकला जातो.
ई-केवायसी कशी करता येते
मेरा राशन या App च्या मदतीने केवायसी करण्याची प्रक्रिया
-सर्वांत प्रथम गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन मेरा राशन App डाऊनलोड करा.
-त्यानंतर रेशनकार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाका.
-आधार किंवा शिधापत्रिका यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून सबमीट या बटणावर क्लिक करा.
-त्यानंतर आधार सिडिंग या ऑप्शनवर क्लिक करा.
-त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सिडिंग Yes किंवा No असा ऑप्शन दिसेल.
-ज्या सदस्याच्या नावापुढे येस हा ऑप्शन असेल, त्या सदस्याला ई-केवायसी करण्याची गरज नाही. आणि ज्या सदस्याच्या नावापढे नो असा ऑप्शन असेल, त्या सदस्याला ई-केवायसी करावी लागेल.
-ई-केवायसी करण्यासाठी खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.












Click it and Unblock the Notifications