Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उद्योगरत्नास अखेरचा सलाम! रतन टाटा पंचत्वात विलीन:अंत्यसंस्कारापूर्वी गार्ड ऑफ ऑनर दिला गेला

Ratan Tata : टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे वयाच्या 86व्या वर्षी बुधवारी निधन झाले होते. तर आज त्यांच्यावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अहोरात्र देशाचा विचार करणाऱ्या एका उद्योगरत्नाचे पर्व संपले आहे. रतन टाटा पंचत्वात विलीन झाले.

दरम्यान, गुरुवारी सकाळपासूनच त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. सकाळपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांची रिघ त्यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी लागलेली होती. मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स हॉलमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केलेला आहे. तर गृहमंत्री अमित शहांसह राज्यातील विविध नेत्यांची स्मशानभूमीत उपस्थिती होती.

RATAN TATA

शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार

रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव आज (10 ऑक्टोबर) रोजी त्यांचे हलेकाय या राहत्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर सकाळी १० वाजल्यापासून दुपारी 3.30 पर्यंत त्यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील एनसीपीएमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले गेले. त्यानंतर दुपारी चार वाजता टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या दिशेने रवाना झाले. यानंतर संध्याकाळी 4 वाजता मरीन ड्राईव्ह मार्गे पेडर रोडवरुन ही अंत्ययात्रा वरळीतील स्मशानभूमीत दाखल झाले. या ठिकाणी रतन टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहा, शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली

उद्योगपती रतन टाटा यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेत्यांनी मुंबईतील वरळी येथील स्मशानभूमीत ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.

पारसी लोकांमध्ये अंत्यसंस्काराची वेगळी प्रथा

प्रत्येक धर्मात माणसाच्या निधनानंतर अंत्यसंस्कार करण्याची पद्धती ही वेगळी असते. सर्वसामान्यपणे हिंदू किंवा मुस्लिम धर्मात मृतदेहाला दफन किंवा अग्नी दिला जातो. पण पारसी लोकांमध्ये अंत्यसंस्काराची प्रथा फारच वेगळी आहे. पारसी लोकांमध्ये व्यक्तीच्या पार्थिवाला दफन करत नाही किंवा मृतदेहाला अग्नीही दिला जात नाही. पारसी समाजातील एखाद्याचा मृत्यू झाला की त्याचा मृतदेह टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे दख्मा येथे नेला जातो.

'दोखमेनाशिनी' म्हणजे काय?

पारसी हा खूप जुना धर्म आहे. या धर्मात ३ हजार वर्षापासूनच्या वेगवेगळ्या प्रथा आजही पाळल्या जातात. पारसी समाजात अंत्यसंस्काराच्या प्रथेला 'दोखमेनाशिनी' असे म्हटले जाते. एखाद्या पारसी व्यक्तीचं निधन झालं की त्या मृत व्यक्तीचं शरीर 'दोखमेनाशिनी' साठी एकांतात नेलं जातं आणि त्यानंतर त्या व्यक्तीचे मृत शरीर गिधाडांसाठी सोडले जाते.

भारतात पारसी लोकांची लोकसंख्या कमी आहे. पण भारतातील सर्वाधिक पारसी हे मुंबई शहरात राहतात. मुंबईत पारसी लोकांची स्वतंत्र स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीला 'टॉवर ऑफ साइलेन्स' असं म्हटलं जातं. या टॉवर ऑफ सायलेन्सजवळ मृत शरीराला आणून ठेवले जातं. त्यानंतर ते मृत शरीर गिधाड येऊन खातात. पारसी समाजाच्या मते असं केल्यावरच त्यांना मुक्ती मिळते. पण आता मुंबईतील ही स्मशानभूमी बंद करण्यात आली आहे.

पारसी लोकांमध्ये अशा पद्धतीने का केले जातात अंत्यसंस्कार?

पारसी धर्मात मृत शरीर हे अपवित्र मानले जाते. पारसी धर्मात पृथ्वी, जल आणि अग्नी या तिन्हीही गोष्टी अतिशय पवित्र असतात. त्यामुळे धार्मिक दृष्टीकोनातून मृतदेह जाळणे किंवा दफन करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. पारसी लोक हे पर्यावरणाबद्दल प्रचंड जागरुक असतात. त्यांच्या मते मृतदेह जाळल्याने अग्नी अपवित्र होतो. तर मृतदेह पुरल्याने पृथ्वी प्रदूषित होते. पारसी लोकांमध्ये मृतदेह नदीत तरंगवूनही अंत्यविधी करत नाही, कारण त्यामुळे पाणी प्रदूषित होते.

याच कारणामुळे पारसी लोकांचा मृतदेह हा टॉवर ऑफ सायलेन्समध्ये उघड्यावर ठेवला जातो. यानंतर प्रार्थना केली जाते. प्रार्थनेनंतर मृतदेह गिधाड आणि गरुडांना खाण्यासाठी सोडला जातो. ही संपूर्ण प्रक्रिया पारसी समाजाच्या परंपरेचा एक भाग आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+