ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी देश सोडावा! शरद पवारांनी महायुतीसोबत यावं, 'या' नेत्याची थेट ऑफर
Ramdas Athawale's statement on Parbhani riots : संविधान ज्यांना मान्य नाही त्यांनी देश सोडून जावं असे थेट वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज परभणीत केले. परभणीत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभुमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यासह काचेमध्ये बंद असलेले जे संविधान ठेवण्यात आले होते, त्याचा अपमान करण्यात आला. त्यां व्यक्तीने शहरात येऊन जे कृत्य केले त्याचा शहरात उद्रेक झाला असेही त्यांनी स्पष्ट केले.
रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेत परभणीतील विषयावर आपले मत व्यक्त केले. तसेच दुकान फोडलेले नाही. बाहेरचे बोर्ड फोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले तसेच जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांशी माझी चर्चा झाली असून आरोपीवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत आपली मतं व्यक्त केली. काय म्हणाले रामदास आठवले हे पाॅईंटरच्या स्वरुपात देत आहोत.
हेही वाचा : पुन्हा असं करशील का?, आंबेडकरी अनुयायांनी परभणी घटनेतील माथेफिरुला विचारला जाब, प्रतिमेसमोर नतमस्तक!
- संविधान ज्यांना मान्य नाही त्यांनी देश सोडून जावं
- देशामध्ये आर्टिकल 17 अंतर्गत जात संपवली आहे,
- बंद काचेमध्ये जे संविधान ठेवण्यात आले होते, त्याचा अपमान करण्यात आला. त्या व्यक्तीने येऊन जो अपमान केला त्यामुळे शहरात उद्रेक झाला. लोकांनी आपल्या भावना अशा स्वरुपात व्यक्त केल्या आहेत.
- दुकान फोडलेले नाही, बाहेरचे बोर्ड फोडले आहेत, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांशी माझी चर्चा झाली असून आरोपीवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- संशयीत व्यक्तीचं किराणा दुकान आहे, त्याची 25 एकर जमीन आहे. त्याच्यामागे कुणाचा हात आहे का? याची चौकशी झाली पाहिजे.
- मुखमंत्र्यांना बोलून मी इथल्या पोलिस अधिक्षकांना येथे कोम्बिंग ऑपेरेशन राबवू नका असे मी सांगितले आहे.
- महिलांवर मारहाण पोलिसांतर्फे करण्यात आली असे सांगण्यात येत आहे. त्याबद्दल पोलिसांवर कारवाई व्हावी अशी मागणी आहे.
- मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की जी पोलिसांनी कार्यवाई केली आहे त्यावर सुद्धा कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.
- 42 लोकांना पकडले असून 10 जणांना जमीन मिळाला आहे
- महाराष्ट्रभर आम्ही शांततेच आव्हान केले होते, सध्या शांतता आहे, पण जे काही कायदा हातात घेण्याचं काम झाला आहे ते चुकीचे आहे.
- समाजाला आव्हान आहे की, आपण शांतता राखावी आणि कुणीही कायदा हातात घेऊ नये.
- पोलिसांनी गाड्या जर फोडल्या असतील तर त्यांच्यावरही कारवाईची आम्ही मागणी करू.
हेही वाचा : परभणी का पेटली, जमावबंदीचे आदेश अन् पॅंथर सेनेचा भाजपवर गंभीर आरोप, वाचा A टू Z घटना
"शरद पवारांनी मोदींसोबत यावे.."
राहुल गांधी यांनी संविधानाचा आधार घेऊन लोकसभेत यश मिळवलं पण सुजाण जनतेच्या लक्षात आल्यानंतर हरियाणा आणि महाराष्ट्रात अपयश आले. महाआघाडीने आपला पराभव का झाला? याचं आत्मचिंतन करावं उगाच इव्हीएमला दोष देऊ नये असेही आठवले म्हणाले. यासह राहुल गांधींनी कर्नाटकमध्ये सरकार आणले. लोकसभेला ते आणि त्यांची बहीण जिंकली तेव्हा इव्हीएम चांगले होते आणि आता हरले की, इव्हीएमला ते दोष देतात असा आरोपही त्यांनी केला. यासह शरद पवारांनी महायुतीसोबत यावं, मोदींच्या खांद्याला खांदा लावून विकास करावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा : पुन्हा असं करशील का?, आंबेडकरी अनुयायांनी परभणी घटनेतील माथेफिरुला विचारला जाब, प्रतिमेसमोर नतमस्तक












Click it and Unblock the Notifications