परभणी का पेटली, जमावबंदीचे आदेश अन् पॅंथर सेनेचा भाजपवर गंभीर आरोप, वाचा A टू Z घटना
Parbhani violence : परभणीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेच्या विटंबनेच्या प्रकरणात आज परभणी बंदची हाक देण्यात आलेली होती. मात्र, बंद हाकेला आज हिंसक वळण लागले अन् आंदोलकांनी कायदा हातात घेत जाळपोळ सुरू केली.
त्यामुळे परभणीत भयावह स्थिती निर्माण झाली. परभणी नेमकी का पेटली, नेमकं कारण काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. चला तर जाणून घेऊया, संपूर्ण वाद अन् आत्ता परभणीतील परिस्थिती काय आहे?
परभणीत बंदच्या हाकेला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर बंद दुकानांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. तसेच पोलिसांच्या गाडींवर ही दगडफेक करण्यात आली, काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात आली आहे.
त्यानंतर आता पोलिसांनी ॲक्शन घेत, या आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळाले. तसेच शहरांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुपारपर्यंत शांततेत सुरू असलेल्या या बंदला अचानक हिंसक वळण लागल्याने या प्रकरणी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे.
पुढील आदेश येईपर्यंत ही जमावबंदी लागू
परभणी बंदच्या हिंसक वळणावर परभणीचे जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शहरात जमावबंदीचे आदेश काढले आहे. परीसारत 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. आज दुपारी 1 वाजेपासून ते पुढील आदेश येईपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार आहे. तसेच सर्व टेलीफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र, ध्वनीक्षेपके आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे ही आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलक आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्यांशी संवाद साधत शांततेचही आवाहन केलं आहे.

जिल्ह्यात काय सुरु, काय बंद?
- भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार परभणी शहर व जिल्हयामध्ये सार्वजनिक ठिकाणी पाच व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध असेल.
- तसेच सर्व टेलीफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके व इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येईल
- हे आदेश कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत.
- हे आदेश दिनांक 11.12.2024 रोजी दुपारीचे 13.00 वाजे पासून पुढील आदेशा पावेतो लागु राहतील.
परभणीत आता पर्यंत नेमकं काय-काय घडलं?
- 5 ते 5.30 च्या सुमारास एका माथेफिरू ने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान शिल्पाची काचे फोडून तोडफोड करत विटंबना केली. यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ या माथेफिरू व्यक्तीला पकडले आणि चांगलाच चोप दिला. यानंतर तत्काळ पोलीस तिथ दाखल झाले पोलिसांनी या माथेफिरूला ताब्यात घेतले. घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आंबेडकरी अनुयायी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमले.
- एकत्र आल्यानंतर पुतळ्यासमोरच रस्ता रोको करण्यात आला काही गाड्यांवर दगडफेक केली. जमावाचे एक टोळके रेल्वे स्थानकात गेले आणि नंदीग्राम एकप्रेस या आंदोलकानी रोकली. अर्धा तास रेल्वे रोको केल्यानंतर पोलिसांनी समजावून आंदोलकांना रेल्वे स्थानकाबाहेर काढले. रात्री उशिरा पर्यंत शहरातील खानापूर फाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जिंतूर रोड पाथरी रोड गंगाखेड रोड वर लोकांनी ठिय्या आंदोलन केले होते.
रात्रीच सर्व आंबेडकरी जनतेकडून परभणी बंदचे आवाहन
- आज सकाळपासून शहरात बंद पाळण्यात आला शहरातील तसेच जिल्हाभरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती शाळा महाविद्यालये ही बंद होती.
- आंबेडकरी अनयायांनी आजही खानापूर फाटा, विद्यापीठ गेट, वसंतराव नाईक यांचा पुतळा तसेच डॉ बाबासाहेब आबेडकर यांचा पुतळा परिसर ठिय्या आंदोलन केले.
- वेगवेगळ्या ठिकाणी टायर पेटवून आंदोलन करण्यात आले
- दुपारी बारा साडेबारा ते एक दरम्यान सर्व आंदोलन शांततेत सुरू असताना अचानक तरुणांचा एक जमाव आला
- हातात काठ्या घेवून दगड घेवून या जमावाने पहिल्यांदा बंद दुकानावर हल्ला चढवला
- बंद दुकानाचा शटरवर काठ्या घातल्या दगडफेक केली विसावा कॉर्नर वरून हा जमाव तसंच पुढे नारायण चाळ आर आर टॉवर परिसरात पोचल तिथेही दगडफेक केली तोडफोड केली
- पोलिसांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली, यानंतर पोलिसांनी ही आंदोलकांवर लाठीचार्ज केला.
- पुन्हा या टोळक्याने विसावा कॉर्नर परिसरात दुकानांच्या बाहेरील साहित्याची तोडफोड करत साहित्य पेटवले
- पोलिसावर पुन्हा दगडफेक करण्यात आली पोलिसांनी अश्रुधुराच्या नालकंड्या फोडल्या लावण्यात आलेली आग विझवण्यात आली
- पोलिसांनी परिस्थिती हाताळत शांत केली. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.
- आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आंदोलक यांच्याशी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्वांना बोलून शांततेचं आवाहन केले.
- सर्वांनी मान्य केले आणि हे सर्व जण बाहेर पडले.
- जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश काढले
- बैठक संपताच महिलांचा एक घोळका जिल्हाधिकारी कार्यालयात शिरला .
- जिल्हाधिकारी दालनात असताना महिलांनी सर्व कार्यालयात तोडफोड केली
- अर्धा तास हे सर्व सुरू होते नंतर पोलिसांनी सर्वांना बाहेर काढले
जिल्हाधिकाऱ्यांचा कार्यालयाची महिलांकडून तोडफोड
परभणीत रस्त्यांवर जाळपोळ आणि दगडफेक झाल्यानंतर आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात संतप्त जमावाने तोडफोड केली आहे. यातील काही आंदोलक महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या आणि या महिलांनी कार्यालयातील काचा, दरवाजे, टेबल खुर्च्यांची तोडफोड केली आहे.
काही वेळापूर्वी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि इतर आंदोलकांची बैठक घेऊन शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान ही घटना घडल्याने हे प्रकरण अधिक चघळल्याचे बघायला मिळाले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नेमक्या काय सूचना?
- परभणी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे एका इसमाने नुकसान केल्याने जमावाने शहरात तणाव निर्माण केला असल्यामुळे परभणी शहरात ताण-तणावाचे वातावरण तयार झाले आहे. लोक गटा-गटाने येउन पुतळ्याच्या बाजूस येउन घोषणाबाजी करीत आहेत. तसेच त्याबाबतचे व्हिडीओ प्रसारीत करीत आहेत.
- जिल्हयात कलम 37 (1) (3) प्रमाणे जमावबंदी आदेश लागु असतानासुध्दा सदरील आदेशास न जुमानता आंदोलनास पाठींबा देण्यासाठी परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया शेजारी मोठ्या प्रमाणात जमाव जमून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- त्यामुळे पुढील कालावधीत शहरात, व जिल्हयात तणावाचे वातावरण निर्माण होवू नये म्हणून परभणी शहर व जिल्हयात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 लावणे बाबत पोलीस अधिक्षक, परभणी यांनी विनंती केली आहे.
- त्याअर्थी, मी. रघुनाथ गावडे, जिल्हादंडाधिकारी परभणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 मधील प्राप्त अधिकाराचा वापर करुन परभणी शहर व जिल्हयामध्ये सार्वजनिक ठिकाणी पाच व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध करीत आहे.
- तसेच सर्व टेलीफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके व इंटरनेट सेवा बंद ठेवणे बाबत आदेशीत करीत आहे. हे आदेश कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत.
- हे आदेश दिनांक 11.12.2024 रोजी दुपारीचे 13.00 वाजे पासून पुढील आदेशा पावेतो लागु राहतील. तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्याने हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्द करावे असेही आदेशीत करीत आहे. सदरचे आदेश दिनांक 11.12.2024 रोजी माझे सही व शिक्यानिशी निर्गमित करण्यात येत आहे.
घटनेमागे भाजपा हस्तक असल्याचा पॅंथरचा आरोप
ईव्हीएम मुद्दा संपवण्यासाठी परभणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेची विटंबना केली, असा आमचा थेट आरोप आहे. तसेच घटनेमागे भाजप आणि भाजपा हस्तक असल्याचा गंभीर आरोप ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केला आहे. ईव्हीएम सुद्धा आम्हीच हटवू आणि अस्मिता सुद्धा आम्हीच जपणार असल्याचे ही ते यावेळी म्हणाले आहे.
परभणीच्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करा. आंदोलनाच्या आडून आमच्या तरुणांचे आयुष्य बरबाद करण्याचे षडयंत्र आम्ही हाणून पाडणार आहोत. भीम सैनिकांची कोम्बिंग किंवा त्यांना अटक करू नका. दंगल घडवण्यासाठीच विटंबना केली हे आता सिद्ध झालंय, असा आरोपही दिपक केदार यांनी केला आहे.
-
भारताला तेल खरेदी करण्यासाठी कोणाच्याही 'परवानगी'ची गरज नाही, विषय संपला ! -
Box Office Report : 'द केरळ स्टोरी 2' ची जादू कायम; नवीन चित्रपटांची संथ सुरुवात, 'ओ रोमियो'ची घसरण -
आहार 2026: एक अनिवार्य व्यापार प्रदर्शन -
IND vs NZ Final: भारत रचणार इतिहास! फायनलमध्ये 'या' 2 स्टार खेळाडूंचा पत्ता कट होणार? कारण काय, वाचा -
महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल! जिष्णू देव वर्मा यांच्याकडे राज्याची धुरा; वाचा त्यांच्याबद्दल -
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! 'एवढ्या' लाखांचे कर्ज माफ होणार! काय स्वस्त काय महाग यादी पहा -
Women's Day 2026: केवळ मेसेज नको, द्या 'हे' खास सरप्राईज! महिला दिनासाठी स्वस्त 5 हटके गिफ्ट आयडियाज -
डोनाल्ड ट्रम्पंबाबत 3 भविष्यवाण्या! 2 ठरल्या खऱ्या; आता तिसरं धडकी भरवणारं भाकित, VIDEO व्हायरल -
IND vs NZ Final: हेड-टू-हेडमध्ये टीम इंडिया 'किंग', पण वर्ल्ड कपमध्ये किवींचेच पारडे जड; आकडेवारी? -
परवानगीची गरज नाही!; रशियन तेल खरेदीबाबत भारताचे अमेरिकेला चोख प्रत्युत्तर; म्हणाले-राष्ट्रहित प्रथम -
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित CM फडणवीसांकडून नव्या योजनांचा पाऊस; वाचा घोषणांची यादी -
इराण-अमेरिका युद्धाचा फटका!'या' कारणामुळे पुण्यातील व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवठा बंद! आले आदेश












Click it and Unblock the Notifications