पुन्हा असं करशील का?, आंबेडकरी अनुयायांनी परभणी घटनेतील माथेफिरुला विचारला जाब, प्रतिमेसमोर नतमस्तक!
परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतीकात्मक प्रतीची 10 डिसेंबर रोजी विटंबना करण्यात आली होती. या घटनेमुळे परभणीमध्ये हिंसाचार घडला. एका माथेफिरुने केलेल्या या विटंबनामुळे गेली दोन दिवस येथील परिस्थिती तणावग्रस्त झाली होती.
तर आता आंबेडकर अनुयायांनी या माथेफिरूला चोप दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होण्यास भाग पाडले. रुग्णालयात दाखल असलेल्या त्या व्यक्तीचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संविधानाच्या प्रतिकामात्मक प्रतीची विटंबना करणारा आरोपी सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. उपचार सुरू असताना परभणी शहरातील काही आंबेडकर अनुयायांनी दवाखान्यात जाऊन त्याच्याशी संवाद साधला. त्यानंतर या आरोपीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाल्याचे समोर आले आहे.
🚨गुन्हेगार पोलीसांचा ताब्यात असून देखील हे सगळे तरूण हॉस्पिटल मधी जाऊन पोलीसान समोर गुन्हेगाराला तुझे छोटे छोटे तुकडे करतो या भाषेत धमकावणे हे कित पत योग्य आहे.
— Adv.Sushama Mane (@mane_sush25493) December 13, 2024
🚨या सगळया तरुणावर परभणी पोलीस ने कारवाई करावी अन्यथा हे असेच गुंड राज चालु ठेवणार
निषेध...... निषेध......... निषेध pic.twitter.com/vthiG7KIo6
व्हायरल व्हिडिओत काय दिसून येतेय?
हॉस्पिटलमधील या घटनेचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत भीमसैनिक या आरोपीला समजाऊन सांगताना दिसत आहेत त्यानंतर दोन्ही हात जोडून माफी मागत डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाल्याचे दिसते.
हे ही वाचा : परभणी का पेटली, जमावबंदीचे आदेश अन् पॅंथर सेनेचा भाजपवर गंभीर आरोप, वाचा A टू Z घटना
परभणी हिंसाचारात 350 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल
परभणी येथे झालेल्या हिंसाचारात जवळपास 300 ते 350 जणांवर विविध कलमान्वये एकूण 8 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 50 जणांना अटक करण्यात आली आहे. यात 41 पुरुष तर 9 महिलांचा समावेश आहे. तसेच शहरातील 10 सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे नांदेड परीक्षेत्राचे पोलिस महासंचालक शहाजी उमप यांनी सांगितले आहे.
या घटनेने संपूर्ण घटनेमुळे परभणीतील अनेक व्यापाऱ्यांचे व निवासाी वसाहतीतील लोकांचे नुकसान झालेले आहे. अनेकांच्या घराबाहेरील गाड्या फोडण्यात आल्या. तर व्यापारी संकुलांचे नुकसान करण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते.
हे ही वाचा : परभणीत हिंसाचार उसळला! संतप्त जमावाने दुकाने-वाहने जाळली, पोलिसांकडून लाठीचार्ज, नेमकं काय घडलं
10 डिसेंबरला काय घडली होती घटना?
दरम्यान, परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतीकात्मक प्रतीची 10 डिसेंबर रोजी विटंबना करण्यात आली होती. या घटनेनंतर शहरात चांगलेच वातावरण तापले होते. जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांनी तसेच भीमसैनिकांनी घटनेच्या निषेधार्थ निषेध मोर्चा काढला होता. तसेच अनेक ठिकाणी हिंसा देखील घडली, माथेफिरू आरोपीला देखील भीमसैनिकांनी चांगलाच चोप दिला होता त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस











Click it and Unblock the Notifications