Ladki Bahin: लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणे अवघड, 'या' नेत्याच्या दाव्याने महिलांचे वाढले टेन्शन!
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. याच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, निवडणुकीपूर्वी महायुतीनं महिलांना 2100 रुपये देणार असल्याची घोषणा केली होती. पण या बजेटवर त्या संदर्भात घोषणा झाली नाही. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आता महायुतीतील एका बड्या नेत्याने देखील आपल्याच सरकारला खडेबोल सुनावले. तर काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या.
काय म्हणाले केंद्रीय मंत्री आठवले?
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लाडकी बहीण योजनेवर महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणे सरकारला अवघड जात आहे, सरकारनं दिलेल्या आश्वासनामुळं महिलांनी भरभरून मतदान केलं आहे. पुढच्या बजेटआधी लाडक्या बहिणींचे पैसे द्यावेत, अशी आमची अपेक्षा आहे. सद्या महायुती सरकारने हा निर्णय जरी घेतला नसला तरी आगामी काळात सरकार ठोस निर्णय घेईल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

औरंगजेब कबरीवर काय म्हणाले?
औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरू झालेल्या वादावर देखील रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. मुस्लिमांना सांगतो आपली औलाद औरंगजेबाची नाही. औरंगजेब चांगला प्रशासक म्हणणे चुकीचे असल्याचे आठवले म्हणाले. औरंगजेब हरामखोर होता. आता विनाकारण हा विषय काढून नये, कबर हटवा या मागणीला आमचा पाठिंबा नाही असे आठवले म्हणाले.
कबर हटवू नका मात्र संभाजी महाराजांचे स्मारक असावे. नागपूर येथे पूर्वनियोजन करून दंगल घडवली. दंगल करणाऱ्यांना कठोर कारवाई करावी असे आठवले म्हणाले. हिंदूंनी शांत राहावे. विनाकारण वाद निर्माण करु नका. सर्व देशातील मंदिरे हे बुद्धांची होती. मुस्लिम समाजाने आपले नाते औरंगजेबाशी जोडू नये असेही आठवले म्हणाले. छत्रपती संभाजी महाराजांनी जबरदस्त कर्तृत्व निर्माण केले आहे असेही आठवले म्हणाले.
बौद्ध मंदिरे आमच्या ताब्यात द्या
बौद्ध मंदिरे आमच्या ताब्यात द्या, मी स्वतः बौद्ध गया येथे जाणार आहे. सर्व धर्माचे ट्रस्टी असावेत. आताचे असणारे ट्रस्टी रद्द करा असेही आठवले म्हणाले. बौद्ध धर्माच्या ट्रस्टीमध्ये इतरांना घेऊ नये असे ते म्हणाले. नेत्यांनी वाद लावू नये. वाद झाले तर देशाच्या विकासाला गती मिळणार नाही. जातीय तेढ निर्माण करू नये. नेत्यांनी तसे बोलू नये. आमदार आणि मंत्र्यांनी शपथ घेतली असून त्याची जाण ठेवावी असेही आठवले म्हणाले. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद मिटवायचा असेल तर RPI ला मंत्री पद द्या असेही आठवले म्हणाले.
मागासवर्गींयासाठी कमवा शिका योजना आणावी
सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली. दलितांकडे कमी लक्ष दिले जात असल्याचे आठवले म्हणाले. राज्य सरकारने खासगी क्षेत्रात आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले. भाऊराव पाटील यांनी जसे कमवा आणि शिका योजना सुरु केली, तशीच योजना सुरू करुन 5 ते 10 हजार द्यावेत असे आठवले म्हणाले.












Click it and Unblock the Notifications