राळेगाव मतदारसंघात रंगणार 2 माजी मंत्र्यांत सामना, कशी आहेत यंदाची गणिते? पुरके की उईके कोण जिंकणार?
Ralegaon Assembly Election 2024 Four way fight : कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला राळेगाव मतदारसंघ हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. गेल्या 10 वर्षांपासून येथे भाजपच्या अशोक उईकेंना लोकांनी निवडून दिलं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं पुन्हा उईकेंना संधी दिली, तर काँग्रेसनं माजीमंत्री वसंत पुरकेंवर विश्वास व्यक्त केलाय. मनसेनंही या मतदारसंघातून अशोक मेश्राम यांना उमेदवारी दिली. वंचित बहुजन आघाडीकडून किरण कुमारे रिंगणात उतरल्याने ही निवडणूक चौरंगी झाली आहे.
लोकसभेला मविआने मिळवली आघाडी
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडे वळलेली 24 हजार मते पुन्हा भाजपकडे वळवण्याचे शिवधनुष्य आमदार उईके यांना पेलावं लागणार आहे. काँग्रेसची पारंपरिक मते भाजपने गेल्या 10 वर्षांत त्यांच्याकडे खेचली. हे मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळवण्याचे आव्हान माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्यासमोर राहणार आहे.

लोकसभेला महायुतीमधून शिवसेनेच्या राजश्री पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख रिंगणात होते. राजश्री पाटील यांना 75,617 मतं मिळाली होती. तर, संजय देशमुख यांना 1,00,294 मतं मिळाली होती. ही मते आपल्याकडे खेचण्यासाठी महायुतीला कसरत करावी लागणार आहे.
काँग्रेसची परंपरा कायम राहील का?
हा मतदारसंघ काँग्रेसचा परंपरागत गड म्हणून ओळखला जातो. 1995, 1999, 2004 आणि 2009 अशी सलग चार वर्षे येथे काँग्रेसच्या प्रा. वसंत पुरकेंनी आमदारकी राखली होती. मात्र 2014 च्या मोदी लाटेत वारं फिरलं आणि भाजपच्या डाॅ. अशोक उईके यांनी हा गड जिंकला. पुढल्या निवडणुकीतही हा मतदारसंघ भाजपमागेच राहिला. मात्र आता गणिते थोडी बदलली आहेत.
कशी झाली होती मागची निवडणूक
राळेगाव विधानसभा मतदारसंघात अशोक उईके विरुद्ध वसंत पुरके अशी लढत गेल्यावेळी म्हणजेच 2019 ला ही झाली होती. राळेगाव मतदारसंघातून त्यावेळी अशोक उईके यांनी वसंत पुरके यांचा पराभव केला होता. अशोक उईके यांना 90,283 मतं मिळालेली. तर, वसंत पुरके यांना 80,948 मतं मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीच्या माधव कोहळे यांनी 10705 मतं घेतली होती.

यंदा कशी आहेत गणिते
पहिल्याच टर्ममध्ये प्रा. उइके आदिवासी विकास मंत्री होते. 2019 मध्येही ते विजयी झाले. दहा वर्षांत त्यांनी येथे निष्ठापूर्वक काम केले. मात्र संघटन पातळीवर भाजपला राळेगावमध्ये अद्यापही पकड घेता आली नाही, हेही खरे आहे. शेतकऱ्यांमध्ये भाजपविरोधी धोरणांची नाराजी असली, तरी लाडकी बहीणसारख्या योजनांचा थोडा फायदा भाजपला होऊ शकतो. दुसरीकडे सलग दोन पराभवांनंतर काँग्रेसमध्ये सध्यातरी एकी दिसत आहे. त्याचा लाभ प्रा. पुरके यांना होण्याची चिन्हं आहेत.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications