Raj uddhav thackeray : मुंबईत राज-उद्धव ठाकरे बंधूंना यश मिळेल का? वाचा हे 3 मुद्दे अन् विश्लेषण
Raj uddhav thackeray alliance bmc 2026 manifesto analysis : "१०० युनिट वीज मोफत, मालमत्ता करात मोठी सवलत आणि महिलांना दरमहा १५०० रुपयांचा स्वाभिमान निधी! बीएमसी निवडणुकीसाठी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मुंबईकरांवर 'आश्वासनांचा पाऊस' पाडला आहे. 'शिवशक्ती' या संयुक्त वचननाम्यातून ठाकरे बंधूंनी केवळ बिल्डरांच्या लॉबीला इशारा दिला नाही, तर गिरणी कामगार आणि कोळीवाड्यांच्या हक्कासाठी नवी सनदच मांडली आहे. ठाकरे बंधूंची ही नवी खेळी महायुतीसमोर किती मोठं आव्हान उभं करणार?" हे दिसून येत आहे.

जरी ठाकरे बंधू महायुतीसमोर मोठंं आव्हान उभं करत असले तरीही युतीचा प्रत्यक्ष निवडणुकीत कितपत फायदा होऊ शकतो याचा अंदाज देत आहोत. तीन मुद्द्यात आपण समजून घेऊया.
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काय फायदा होईल?
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे मुंबईत प्रामुख्याने तीन स्तरांवर फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी मतांचे एकत्रीकरण
गेल्या अनेक निवडणुकांमध्ये शिवसेना आणि मनसे वेगवेगळे लढल्यामुळे मराठी मतांचे विभाजन व्हायचे, ज्याचा थेट फायदा भाजपला झाला. आता ही दोन्ही शक्ती एकत्र आल्यामुळे मुंबईतील मराठी मतपेढी पुन्हा एकदा ठाकरेंच्या मागे भक्कमपणे उभी राहू शकते. मुंबईतील २२७ पैकी साधारण १५० वॉर्डांमध्ये मराठी मते निर्णायक आहेत.
दक्षिण-मध्य मुंबईत ठाकरे प्रबळ ठरणार?
शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांची ताकद त्यांच्या जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये (Cader) आहे. युतीमुळे कार्यकर्त्यांमधील जुना संघर्ष संपून एक नवा उत्साह संचारला आहे. विशेषतः दक्षिण आणि मध्य मुंबईत ही युती अत्यंत प्रबळ ठरेल असे सांगितले जात आहे.
'शब्द ठाकरेंचा' भावनिक आवाहन अन् मुंंबईकर
'शिवसेना भवन' येथे दोन्ही भावांनी एकत्र येणे हा शिवसैनिकांसाठी मोठा भावनिक क्षण होता. बाळासाहेबांचा वारसा आणि "मुंबई मराठी माणसाची" हा अजेंडा घेऊन ही युती मतदारांना साद घालत आहे. युतीच्या वचननाम्याच्या मुखपृष्ठावरही बाळासाहेबांचा फोटो असून "शब्द ठाकरेंचा" असे ब्रीदवाक्य वापरले आहे. एकंदरीतच दोन्ही ठाकरे एकत्र यावेत ही मुंबईकर आणि महाराष्ट्रातील असंख्य जनतेची इच्छा पुर्ण झाली त्यामुळे आता ठाकरेंना एकदा संधी मुंबईकर देतील ही शक्यता जास्त आहे.
'शिवशक्ती' वचननाम्यातील हायलाईट्स
परवडणारी घरे: पुढील ५ वर्षांत १ लाख घरे बांधणार आणि ५०० ते ७०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर पूर्णपणे माफ.
महिलांसाठी 'स्वाभिमान': घरकाम करणाऱ्या आणि कोळी महिलांना दरमहा १,५०० रुपये स्वाभिमान निधी.
स्वस्त भोजन: अवघ्या १० रुपयांत नाश्ता आणि जेवण देणारी 'मासाहेब किचन' योजना.
मोफत वीज व प्रवास: बेस्ट द्वारे १०० युनिटपर्यंत वीज मोफत आणि बस प्रवासाचे दर ५ ते २० रुपयांपर्यंत मर्यादित.
आरोग्य सेवा: ५ नवीन मेडिकल कॉलेजेस आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 'हेल्थ-टू-होम' सेवा.
शिक्षण: महापालिका शाळांमध्ये १२ वी पर्यंतचे शिक्षण आणि ८ वी नंतरच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब.
पायाभूत सुविधा: रस्त्यांच्या कामासाठी कंत्राटदाराकडून १५ वर्षांची गॅरंटी आणि 'पादचारी प्रथम' धोरणांतर्गत उत्तम फुटपाथ.












Click it and Unblock the Notifications