शेवटच्या भाषणातही राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा; म्हणाले, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर...
Maharashtra Assembly Election 2024- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज सायंकाळी संपत आहे. त्यापूर्वी राज ठाकरे यांनी शेवटची प्रचारसभा घेत पुन्हा एकदा मनसे कोणती भूमिका घेऊन निवडणूक लढवत आहे, हे स्पष्ट केलं. आपल्या शेवटच्या प्रचारसभेत त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. लालबाग मेघवाडी येथे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्यासाठी राज ठाकरे यांनी शेवटची प्रचारसभा घेतली. शरद पवारांनी महाराष्ट्रातील हिंदूत्व तोडण्याचं काम केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
या सभेत राज ठाकरे यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न खोळंबलेले आहेत. महारााष्ट्रात अत्यंत वाईट परिस्थिती आहे. चालायला फुटपाथ नाही, गाडी चालवायला रस्ते नाही. हॉस्पिटमध्ये बेड मिळत नाही, रोजगार नाही. रोजगारासाठी खेड्यातली मुलं शहरात येत आहेत. मुंबई-पुण्यातील मुलं परदेशात जाण्याचा विचार करत आहेत. अनेक विषय आहेत, ज्याची सोडवणूक झालेली नाही. त्याच प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मनसे निवडणूक लढवत आहे, असं सांगत त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
शरद पवारांवर थेट आरोप
या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर पुन्हा जातीयवादाचा आरोप केला. ते म्हणाले, " महाराष्ट्रातील मुलभूत प्रश्नांची सोडवणूक झाली नसल्यामुळे तुमचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी किंवा वळावं यासाठी काही गोष्टींची सोय करण्यात आली आहे. महाराष्ट्र हा हिंदुत्वाने भारावलेला आहे. पण, हिंदुत्वाने भारावलेल्या महाराष्ट्रातलं हिंदुत्व तोडण्याचं काम शरद पवारांनी केलं. जाती-जातींमध्ये भेद निर्माण केले. मी अनेक सभामधून सांगितलंय शिवसेना, मनसे, काँग्रेस, एनसीपी, भाजप हे राजकीय पक्ष मेले तरी चालतील, पण महाराष्ट्र जगला पाहिजे. महाराष्ट्रात अत्यंत घाणेरडी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर, हे सगळं सुरु झालं, असं म्हणत राज ठाकरे यांनी पवारांवर जातीयवादाचा आरोप केला.
व्याकरण बिघडलं तर...
राज ठाकरे म्हणाले, "आज आम्ही आमच्या महापुरुषांना जातीमध्ये वाटून घेतलंय. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा ज्योतिबा फुले माळ्यांचे, लोकमान्य टिळक ब्राह्मणांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे. काही लोक अशा दृष्टीन बघायला लावत आहेत. जात प्रिय असणं मी समजू शकतो. पण दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायचा. महाराष्ट्रातील परिस्थिती भीषण आहे. आपण प्रत्येकाने महाराष्ट्र सुधारला पाहिजे. निवडणुका येतात-जातात. हा पडेल, तो पडेल... हे चालूच राहतं. पण एकदा राज्याच व्याकरण बिघडलं, तर सुधारता येणार नाही. मी जो प्रयत्न करतोय तो हा प्रयत्न करतोय" असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications