मुंबईच्या राजकारणात नवे पर्व!; 'बेस्ट'च्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र, मनपा निवडणुकीवर शिक्कामोर्तब!
Uddhav Thackeray with Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) यांच्या एकत्र येण्याची चर्चा जोर धरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या चर्चांना आता अधिक बळ मिळाले आहे.
विशेषतः मुंबईतील बेस्ट उपक्रम कामगार पतपेढीच्या आगामी निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात युती झाली. त्यामुळे आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही दोन्ही पक्ष एकत्र येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बेस्ट निवडणुकीत युतीचा प्रयोग!
बेस्ट उपक्रम कामगार पतपेढीची निवडणूक १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघटनांनी मिळून 'प्रणित उत्कर्ष पॅनेल' स्थापन केले असून, ते या निवडणुकीत एकत्रितपणे लढणार आहेत.
हा निर्णय राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 'मातोश्री'वर जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच युतीची चर्चा सुरू झाली होती आणि आता बेस्टच्या निवडणुकीत ही युती प्रत्यक्षात आल्याने, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
राज ठाकरेंचा मनसैनिकांना सल्ला!
राज ठाकरेंनी नुकत्याच झालेल्या एका पदाधिकारी मेळाव्यात मनसैनिकांना एक महत्त्वाचा संदेश दिला. ते म्हणाले, "२० वर्षांनी आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही कशाला वाद निर्माण करता?" राज ठाकरे यांच्या या विधानाचा अर्थ स्पष्ट आहे. ते केवळ बेस्टच्या निवडणुकीपुरती युती मर्यादित ठेवू इच्छित नाहीत, तर भविष्यातील मोठ्या राजकीय लढाईसाठी कार्यकर्त्यांना तयार करत आहेत.
मुंबई महापालिकेसाठी निर्णायक लढाई !
सध्याच्या राजकीय परिस्थितीत, भाजप आणि महायुतीचा मुंबई महापालिकेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न आहे. अशावेळी, मुंबई महापालिकेवरील शिवसेनेचा भगवा अबाधित ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येणे हे त्यांच्यासाठी एक प्रभावी पाऊल ठरू शकते. दोन्ही भावांनी एकत्र येऊन निवडणूक लढल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो, असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे.
एकंदरीत, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतील ही युती भविष्यातील मोठ्या राजकीय समीकरणांची नांदी मानली जात आहे. आगामी काळात ही युती अधिक मजबूत होऊन महापालिका निवडणुकीत एकत्र लढते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
-
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
लिव्ह-इन, लॅविश लाईफ आणि ३५० कोटींची माया; 'मेजर इक्बाल' अर्जुनचा पडद्यामागचा शाही थाट -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी





Click it and Unblock the Notifications