काय सांगता..? राज-उद्धव ठाकरे एकत्र, संवादही साधला; महापालिका निवडणुकीत युती दिसेल?
गेल्या अनेक वर्षांपासून तू-तू मै-मै असलेल्या राज व उद्धव ठाकरे हे बंधुत आज एकत्र दिसले. या दोघांनीही एकमेकांशी संवाद साधला. भाच्याच्या लग्नात हे दोन्ही मामा एकत्र आल्याने राजकीय चर्चांना मात्र उधाण आले. या दोघांनीही एकमेकाशी संवाद साधल्यानंतर राजकीय पटलावर त्याचे पडसाद उमटले. वास्तविक, हा कौटुंबिक आनंदसोहळा असला तरी, या दोघांच्या बाँडीलँग्वेजवरुन हे दोघेही एकत्र येतील का, या शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.

दोन्ही ठाकरे आले एकत्र
मुंबईतील दादरमध्ये राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचा लग्न सोहळा आज झाला. या लग्न सोहळ्यात दोन मामा म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. दोन्ही भावांनी एकमेकांशी हातमिळवणी करत संवाद साधला. हे दृश्य पाहुन मराठी माणूस सुखावला. टोकाच्या भूमिकेनंतर दोन्ही भावांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. या दोघांनी एकत्र यावे, अशी हाक यापूर्वी शिवसैनिकांनी अनेकदा दिली आहे. त्यामुळे या भेटीने चर्चा वाढल्या.
एकमेकांशी साधला संवाद
दादर येथील भाच्याच्या विवाह सोहळ्यात दोन्ही ठाकरे बंधु एकत्र आल्यानंतर त्यांच्यात संवाद झाला. दोघांनी खेळीमेळीचे वातावरण अगदी दिलखुलास गप्पा मारल्या. दोन्ही भावांनी बराच वेळ एकमेकांशी चर्चा केली. पाच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या कौटुंबिक सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी रश्मी ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं होते. त्यानंतर त्याच आठवड्यात म्हणजे आज हे दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे.
मनोमिलन होण्याची शक्यता
यापूर्वी अनेकदा राज ठाकरे यांनीही उद्धव यांच्यासोबत एकत्र येण्यासंबंधी संकेत दिले होते. एकमेकांचे कट्टर दुश्मन एकत्र येऊ शकतात, पण उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळच वाटते, असं त्यांचं वक्तव्य राज ठाकरे यांनी यापूर्वी केलं होतं. ते वक्तव्य चांगलंच चर्चेतही आलं होतं. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी एकला चलो रे चा नारा दिला. तर आगामी महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनीही स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत हे दोघे एकत्र येतील अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications