Raj Thackeray : जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंचा मार्मिक टोला
Raj Thackeray speech in Mumbai Rally : उद्धव आणि मी 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायला, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, असा टोला मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.
ते शनिवारी वरळी डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमात राज आणि उद्धव ठाकरे या बंधूंचे मनोमिलन होताना दिसले. यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांना संबोधित केले.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सन्माननीय उद्धव ठाकरे, अशी केली. यानंतर त्यांनी आपले नेहमीचे माझ्या तमाम मराठी माता बंधू आणि भगिनींनो हे नेहमीचे वाक्य उच्चारले. राज ठाकरे यांनी म्हटले की, आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस सर्व बाजूंनी कसा एकवटतो, हे चित्र त्यांना दिसले असते. पण फक्त मोर्चाच्या घोषणेनेच यांनी माघार घेतली, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

राज ठाकरे म्हणाले की, राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय सरकारने कोणासाठी घेतला? कोणाला विचारायचं नाही, शिक्षणतज्ज्ञांना काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, बहुमत आहे, आम्ही निर्णय लादणार. पण तुमच्या हातात सत्ता असेल तरी विधानभवनात. आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर. हिंदी सक्तीच्या विरोधात मी सरकारला पत्रं लिहली. नंतर दादा भुसे माझ्याकडे आले. मला म्हणाले की, आम्ही काय म्हणतोय, ते समजून तर घ्या, ऐकून तर घ्या. मी त्यांना म्हटलं दादा तुम्ही काय सांगताय ते ऐकून घेईन, पण ऐकणार नाही.
त्रिभाषा सूत्रं कुठून आणलं? ते केंद्र आणि राज्य सरकारमधील दुव्यासाठी आणलं. हायकोर्टात आणि इतर सगळीकडे दैनंदिन व्यवहार इंग्रजी भाषेत होतात, मग त्रिभाषा सूत्राची गरज काय? दक्षिणेत हे त्रिभाषा सूत्र नाही, मग यांनी महाराष्ट्रात प्रयोग करुन पाहिला. पण महाराष्ट्र पेटून उठतो त्यावेळी काय होतं, हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली. विनाकारण आणलेला विषय होता, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
हिंदी भाषिक राज्य आर्थिकदृष्ट्या मागास आहेत आणि हिंदी न बोलणारी राज्य आर्थिकदृष्ट्या प्रगत आहेत आणि वर आम्ही हिंदी शिकायचं. यांना हिंदीतून राज्याचा विकास करता आला नाही. हिंदी भाषक राज्यातून लोकं इकडे नोकरीसाठी येत आहेत आणि हे बोलतात हिंदी शिका, मग हिंदी कोणासाठी शिकायचं?, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, अमित शहा म्हणतात की, भविष्यात ज्याला इंग्रजी येईल, त्याला लाज वाटेल. पण त्यांनाच स्वत:ला इंग्रजी येत नाही येत. मराठा साम्राज्य अटकेपार पोहोचले होते. मराठ्यांनी सव्वाशे वर्षे आम्ही राज्य केलं, पण आम्ही मराठी लादली का?, असा सवाल राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात विचारला. लालकृष्ण आडवानी क्रिश्नन मिशनरीमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वार शंका घेऊ का?, दक्षिण भारतामध्ये तामिळ, कन्नडसाठी कडवट पणे जगतात.
राज ठाकरे म्हणाले की, कडवटपणा किंवा मराठीचा अभिमानाबाबतीत बाळासाहेब यांनी कधीही तडजोड केली नाही. संरक्षण खात्यामध्ये या रेजिमेंट आहेत, मद्रास रेजिमेंट, जाट, पंजाब, बिहार, महार, जम्मू काश्मीर इतक्या रेजिंमेंट आहेत. भाषेचा प्रश्न येतो कुठे, भाषावार प्रांत रचना त्यासाठीच झाली ना. या सगळ्या गोष्टी कशासाठी सुरू केल्यात, यामागचे राजकारण काय?
पुढचं राजकारण जातीजातीमध्ये विभागण आहे?
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातील तमाम एकत्र आलात पुढचं राजकारण जातीमध्ये विभागायला सुरुवात करणार. मराठीमध्ये एकत्र येऊ देणार नाही, जातीपातीमध्ये व्यापाऱ्याला मारले, एवढं व्यापारी आहेत, अजून तर काहीच केले नाही. त्यांना मराठी आली पाहिजे.
जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे!
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. चूक त्यांची असली पाहिजे. त्याचे व्हिडिओ काढू नका, आपल्या आपल्या मध्येच कळलं पाहिजे. मारणारा सांगत नसतो, मार खाणारा सांगत असतो. माझे नयन शहा नावाचे गुजराती आहेत, माझा मित्र शिवाजी पार्क मध्ये पु.ल. देशपांंडे ऐकणार गुजराथी आहे.
मराठीचे बाळकडू आम्हाला घरातच मिळाले!
मराठीचे बाळकडू आमच्यासाठी आहेत, धमण्यांमध्ये आलं कुठून, यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 1999 साली शिवसेना भाजप सरकार येणार नाही येणार, पवार साहेब यांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला होता. त्या वादामध्ये काहीच होईना, दिवसेंदिवस दिवस चालले, एकेदिवशी मातोश्री आले चार वाजले असतील. प्रकाश जावडेकर यांना भेटायला आले आहे, बोलायचे काम करतो. मुख्यमंत्री पदाचा विषय झालेला आहे. सुरेश दादा जैन मुख्यमंत्री यांना सांगायचे आहे. काळोख शांतता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, मराठी या विषयामध्ये सत्तेवर लाथ मारली. हे संस्कार पोरावरती झाले असतील तर मोठ्या. मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही. याच्यापुढे सर्वांनी सावध असणं गरजेचे आहे, सतर्क असणं गरजेचे आहे. मराठीसाठी एकजूट कायम राहावी. बाळासाहेबांचे स्वप्न साकार करूया, असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी केले.












Click it and Unblock the Notifications