Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंनी उडवली खिल्ली; म्हणाले- हड..मी ते पाणी नाही पिणार.अंध...

Raj Thackeray on Kumbh mela watar Bath : कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरे यांनी जोरदार खिल्ली उडवली आहे. गंगा स्वच्छ होणार हे मी राजीव गांधी यांच्यापासून ऐकत आलो आहे. बाळा नांदगावकर यांनी कुंभमेळ्यातून गंगेचे पाणी माझ्यासाठी आणले होते. मी त्यांना म्हटले हड मी ते पिणार नाहीये, असे म्हणत त्यांनी महाकुंभातील पाण्याची खिल्ली उडवल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

पुण्यात मनसेच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त खास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. तर भारतातील एकही नदी स्वच्छ नाहीये. परदेशातील नद्या बघा सर्वांनी. त्या कशा स्वच्छ आहेत. यावरुन पुढे बोलत त्यांनी महाकुंभातील पाण्याचीही खिल्ली उडवली.

Raj Thackeray

मीडियातून टाळकी फिरवण्याचे काम सुरू

राज ठाकरे म्हणाले की, एकमेकांमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न महाराष्ट्रात सध्या सुरू आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून टाळकी फिरवण्याचे काम सुरू आहे. गुढीपाडव्याला दांडपट्टाच फिरवणार आहे. राजकारण्यांनी महाराष्ट्रात चिखल केलाय. महिला दिन हा जिजाऊंच्या नावाने ओळखला पाहिजे. राज्यात राजकिय फेरीवाले आलेत. राजकिय फेरीवाले आपल्या पक्षात नाहीत.

कामचुकार कार्यकर्त्यांना पदावर ठेवणार नाही

पुढे राज ठाकरे म्हणाले की, संघटना मजबूत करणे गरजेचे आहे. पक्षातील प्रत्येकाचे काम दर 15 दिवसांनंतर तपासले जाणार. कामात जर दिरंगाई केली तर पदावर ठेवणार नाही, असा सज्जन दमच राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिलाय. कामचुकार कार्यकर्त्यांना पदावर ठेवणार नाही, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिलाय.

यावेळी त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांनी शिवतीर्थावर यावे असेही म्हटले आहे. 11 मार्चला सर्वांना जबाबदाऱ्या देणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. यावेळी ते म्हणाले की, काही गोष्टी मी आताच स्पष्ट बोलू शकत नाही आणि मी बोलणारही नाही.

अंधश्रद्धेतून जरा बाहेर या, डोकी हलवा

मध्यंतरी मुंबईत आमच्या पदाधिकाऱ्यांची मेळावा बैठक लावली होती. त्यात काही शाखेचे पदाधिकारी गैरहजर होते आणि जे गैरहजर होते त्यांची हजेरी मी घेतली. त्यावेळी प्रत्येकाला विचारलं असता त्यातला अनेकांनी आपली आपली करणं दिली. त्यातल्या बहुतांश लोकांनी कुंभमेळ्याचे कारण पुढे केले. मुळात तुम्ही पाप करताच कशाला? असा प्रश्न मी त्यांना केला. शिवाय परत आल्यावर अंघोळ केली का असं ही विचारलं.

बाळा नांदगावकर ही कमंडलुमधून पाणी घेऊन आले. मी नाही पिणार पाणी वैगरे, असं मी त्यांना म्हणालो. सोशल मीडियावर माणसं-बाया अंग घासून अंघोळ करताय आणि आमचे बाळा नांदगावकर पाणी प्यायला देत आहेत. मला सांगा कोण पिणार ते पाणी, असं म्हणत राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली आहे.

राज ठाकरे यांनी केलेल्या कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या विधानाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. भाजपाकडून त्यांच्यावर टीका देखील करण्यात आलीये. आता गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. काही दिवसांपूर्वीच चर्चा रंगताना दिसली की, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येऊ शकतात. मात्र, यावर दोघांनीही काही भाष्य केले नाहीये.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+