राहुल सोलापूरकरांचे आता आंबेडकरांबाबत वक्तव्य; जितेंद्र आव्हाड म्हणतात, हा दिसेल तेथे तुडवा...
ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी गेल्या आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी महाराजांनी लाच दिली होती, असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरुन आता महाराष्ट्रभर वादंग पेटला असतानाच सोलापूरकर यांच्या दुसऱ्या एका विधानावरुन आ. जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत.

सोलापूरकर यांचं वक्तव्य काय?
गेल्या आठवड्यात राहुल सोलापूरकर यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. एका मुलाखतीत त्यांनी शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केल्यानंतर त्याचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते. आग्र्याच्या कैदेतून सुटण्यासाठी महाराजांनी लाच दिल्याचा दाखला सोलापूरकर यांनी दिला होता. सोलापूरकर याच्या या विधानावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. निषेध म्हणून राज्यभरात अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलने करण्यात आली. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोलापूरकरला गोळ्या घालण्याची भाषा केली होती.
आंबेडकरांबद्दलही केलं वक्तव्य
सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा वाद थांबलेला नसताच सोलापूरकर याने आणखी एक वादग्रस्त विधान केलं. वेदांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते, असा जावई शोध राहुल सोलापूरकर यांनी लावला. ते म्हणाले की, रामजी सपकाळ या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेले भिमराव यांना आंबावडेकर नावाच्या एका गुरुजीनी दत्तक घेतले होते. त्याच नावावरून पुढे ते भीमराव आंबेडकर म्हणून मोठे होतात. त्यांनी प्रचंड अभ्यास केला. वेदांमध्ये म्हटलं जातं की, अभ्यास करून मोठे झाले ब्राम्हण ठरतात. त्या आर्थाने भीमराव आंबेडकर वेदांमध्ये ब्राह्मण ठरतात, असं वादग्रस्त वक्तव्य सोलापूरकर याने केलं.
राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा. याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचे , देशाचे वाटोळे केले आहे. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही. आता तर डाॅ… pic.twitter.com/DHfhVgohqe
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 9, 2025
जितेंद्र आव्हाडांचा संताप
राहुल सोलापूरकर याच्या या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली. ते लिहितात, राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा. याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचे , देशाचे वाटोळे केले आहे.
राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही. आता तर डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलून सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. याच्या डोक्यावर नसलेले केस उगवावे लागतील; ते कसे उगवायचे, ते बहुजन अन् आंबेडकरवादी ठरवतील. या मनुवाद्यांनाच छत्रपती शिवाजी महाराज आणि डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचा का त्रास होतो, हेच समजत नाही. याला दिसेल तिथे तुडवा !!












Click it and Unblock the Notifications