धारावीच्या नकाशाचे पोस्टर, तिजोरी आणत राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर सडकून टीका! 4 पाॅईंटमध्ये वाचा
Rahul Gandhi Showing Dharavi map poster treasury criticises Narendra Modi, Adani :भाजपच्या एक हैं तो सेफ हैं पासून बटेंगे तो कटेंगे या मुद्द्यांचा राहुल गांधी यांनी आज जोरदार समाचार घेत धारावीच्या नकाशाचे एक पोस्टर आणि तिजोरी आणुन त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाना साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात घेतलेल्या सभांमध्ये सातत्याने काँग्रेसवर जातींमध्ये भांडण लावण्यात येत असल्याचा आरोप केला. या आरोपांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं.

1. तिजोरीतून काढले मोदी, शहांचे पोस्टर
पत्रकार परिषदेत धारावीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी निशाणा साधला. एक है तो सेफ है यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावत भर पत्रकार परिषदेत एक तिजोरीच आणली. या तिजोरीतून पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे फोटो काढले. तसंच धारावीचा नकाशा असलेलं पोस्टर हातात घेत राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली.
2. अदानी सेफ, धारावीची जनता असुरक्षित!
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी एक है तो सेफ है असं म्हणतात ते योग्यच आहे. पण कोण एक आणि कोण सेफ असा प्रश्न आहे. एक है तो सेफ है, एक नरेंद्र मोदी, अदानी, अमित शहा,आणि कोण सेफ तर अदानी सेफ. त्रास फक्त धारावीच्या जनतेला, नुकसान धारावीच्या जनतेला, लघु उद्योगाचं प्रतिक धारावी आहे. हे संपेल. त्यांनी नारा दिला आम्ही तुम्हाला समजावून सांगितला.
3. आठ प्रकल्प, 7 हजार कोटींची गुंतवणूक गेली
इथली जमीन धारावीत राहत असलेल्यांचीच आहे. ते तिथं काम करतात. लघु उद्योगांचं हब आहे. तिथलं हे सगळं काम फक्त एका व्यक्तीला मदत करण्यासाठी आहे. ते म्हणजे अदानी असून महाराष्ट्राचं धन हे राज्यातल्याच जनतेला मिळावं ते एका व्यक्तीला मिळू नये अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. यासह राज्यातून आठ प्रकल्प गेले, यात वेदांत फॉक्सकॉन, टाटा एयरबस , आयफोन असेंबल प्रोजेक्ट , ड्रग्स पार्क, सेमीकंडक्टर प्लांट असे अनेक प्रकल्प गेले असा आरोप राहुल गांधींनी केला. 7 हजार कोटींची गुंतवणूक अन् 5 लाख युवकांचा रोजगार गेला असेही राहुल गांधींनी म्हटले आहे.
4. 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासारख्या मुद्द्यांवर भाजपचे मौन
राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संविधानाला 'कोरे पुस्तक' मानल्याचा आरोप केला. भाजप आणि आरएसएस त्याला कमकुवत करत आहेत, तर काँग्रेस त्याला भारताचा डीएनए मानते, असा दावा त्यांनी केला. जातनिहाय जनगणना आणि 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाजपच्या मौनावरही त्यांनी टीका केली. गांधींच्या मते, या सुधारणा समुदायांमधील न्यायासाठी महत्त्वाच्या आहेत.












Click it and Unblock the Notifications