Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसे..? राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत मांडले अनेक प्रश्न

काँग्रेसचे नेते व लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा अधिक मतदान झाल्याचं सांगत केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. त्यासोबतच निवडणूक आयोगाला काही सवाल केले. पाच वर्षामध्ये हिमाचल राज्यातील लोकसंख्येइतके मतदार कसे वाढले, असा प्रश्न राहुल गांधी निवडणूक आयोगाला विचारला. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

Rahul Gandhi

लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार

पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्र निवडणुकीचा आम्ही अभ्यास केला. हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येएवढे मतदार वाढले. २०१९ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्रामध्ये ३४ लाख मतदार वाढले. महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येपक्षा जास्त मतदार आहेत. मतदार यादीमध्ये अनेक अनियमितता आढळल्या. वाढलेल्या मतदारांची आम्हाला नाव पत्ता आणि फोटोसह यादी हवी. महाराष्ट्रातील तीन प्रमुख पक्ष तुम्हाला मतदारांची यादी मागत आहेत. महाराष्ट्राची वयस्क लोकसंख्या ९.५४ कोटी आणि निवडणूक आयोगाच्या मते ९.७ कोटी मतदार आहेत. महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे काय?

नवीन मते भाजपला जातात

राहुल गांधी पुढे म्हणाले की, कामठी मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १.३६ लाख मते पडली आहेत. विधानसभेला जवळपास १.३४ लाख तवेढीच मते पडली आहेत. लोकसभेला आम्ही जिंकलो. या मतदारसंघात ३५ हजार नवीन मतदार जोडले जातात आणि ही सगळे मते भाजपला जातात आणि भाजपचा विजय होतो. महाराष्ट्रात असं अनेत मतदारसंघात झालं आहे. काँग्रेसची मते वाढली नसून भाजपची मते वाढली आहेत. आम्हाला विधानसभेच्या मतदारांची अंतिम यादी आम्हाला मिळायला हवी. निवडणूक आयोगाचं काम आहे की मतदारांची यादी तिन्ही पक्षाला मिळायला हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

३९ लाख मते वाढली- राऊत

मतदार यादीतील वाढलेली ३९ लाख मते फिरत असतात. ती मते आता बिहार तिथून उत्तर प्रदेशकडे जाणार आहेत. ही मते दिल्लीमध्येही गेली असून ही फिरती मते आहे. कारण भाजप या मतांच्या आधारावरच निवडणुका जिंकत आहे. जनतेने आता जागृत व्हायला हवं. आम्ही तर लढणाक आहोतच पण मीडियानेसुद्धा हा प्रश्न सरकारला करायला हवा, असं ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+