Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुणेकर म्हणतात, असा पाऊस पाहिला नाही; अवकाळी पावसाचा कहर

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार, पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः पुणे, मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात या पावसाचा जोर अधिक जाणवणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Pune rain today

आज, २० मे रोजी, पुण्यात अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात मोठा गोंधळ निर्माण झाला. नेमक्या ऑफिस सुटण्याच्या वेळेस आलेल्या या पावसामुळे रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली, अनेक भागांत पाणी साचले आणि नागरिकांचे हाल झाले. पुण्यातील प्रमुख भागांमध्ये रस्ते अक्षरशः नद्यांमध्ये रूपांतरित झाले.

पुण्यात पावसाचा कहर

पुणे शहरात संध्याकाळच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने काही वेळातच रस्त्यांवर पाणी साचवायला सुरुवात केली. कात्रज, बाणेर, हिंजवडी, बिबवेवाडी आणि डीपी रोडसारख्या भागांमध्ये पाण्याचा स्तर इतका वाढला की दुकाने आणि घरांमध्येही पाणी घुसले. बाणेरमधील बीटवाईज चौकात अनेक दुचाकी आणि चारचाकी गाड्या पावसाच्या पाण्यात अडकल्या, तर काही गाड्या तरंगताना दिसल्या.
कात्रज भागात तर दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला.

तर हिंजवडी भागात आयटी कंपन्यांकडून ऑफिस सुटण्याच्या वेळेस कर्मचाऱ्यांना मोठ्या वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले. अनेक रस्त्यांवर एवढ्या प्रमाणात पाणी साचले की दुचाकी गाड्या वाहून गेल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हवामान खात्याचा अंदाज

हवामान विभागाचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसळीकर यांनी आज दुपारीच महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. विशेषतः पुणे, नाशिक, रायगड, कल्याण, माथेरान, श्रीवर्धन, दापोली या भागांमध्ये संध्याकाळी पावसाची तीव्र शक्यता वर्तवली होती. हा पाऊस पुढील ३ ते ३.५ तास कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. याबरोबरच काही ठिकाणी वादळी वारे, वीजांचा कडकडाट यांचाही अनुभव नागरिकांना येण्याची शक्यताही वर्तवली होत.

मुंबईतही अवकाळी पावसाचा तडाखा

मुंबई शहरालाही या पावसाने मोठा फटका दिला. विशेषतः पश्चिम उपनगरांमध्ये, अंधेरी सबवे परिसरात अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात दोन ते तीन फूट पाणी साचले. यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. परिणामी अंधेरी पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागांत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. अनेक प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले, तर काहींना चालत घरी जावे लागले.

या पावसामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा नाल्यांच्या सफाईविषयी शंका उपस्थित झाली आहे. मान्सूनपूर्व आलेल्या या पावसानेच जर सबवे जलमय केला असेल, तर खरी पावसाळी स्थिती किती भीषण असेल, याची कल्पना लोक करत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+