शस्त्रपूजन केलं, शपथ घेतली अन् कोमकरला संपवलं; बदला घेण्याचा प्लॅन कसा केला?
पुण्यात टोळीयुद्धाचा भडका! नाना पेठेत नातवाचा गोळ्या घालून खून; 'वनराज'च्या अंत्यविधीवेळी घेतलेल्या शपथेची चर्चा
एकिकडे, गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असताना, दुसरीकडे नाना पेठेत टोळीयुद्धाच्या रक्तरंजित घटनेने खळबळ उडवून दिली आहे. गेल्या वर्षी खून झालेल्या वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याच्या 20 वर्षीय मुलाचा, आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर याचा गोळ्या घालून खून करण्यात आला आहे. ही घटना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

नेमका प्रकार काय घडला?
शुक्रवारी रात्री पावणेआठच्या सुमारास नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे ही घटना घडली. आयुष कोमकर, जो महाविद्यालयीन शिक्षण घेत होता, तो आपल्या मित्रासह कॉम्प्लेक्सच्या गेटवर उभा होता. त्याचवेळी दोन अज्ञात हल्लेखोर तिथे पोहोचले. त्यांनी थेट आयुषवर तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात आयुष गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मित्रही जखमी झाला आहे. घटनेनंतर आरोपी तात्काळ घटनास्थळावरून पसार झाले.
हा खून गणेशोत्सवाच्या धामधुमीत आणि अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने पुण्याच्या मध्यवर्ती भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
टोळीयुद्धाची पार्श्वभूमी आणि बदल्याची शपथ
आयुष कोमकरच्या खुनाचे थेट संबंध गेल्या वर्षीच्या टोळीयुद्धाशी जोडले जात आहेत. गेल्या वर्षी, 1 सप्टेंबर रोजी आंदेकर टोळीचा आधारस्तंभ आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा डोके तालीम परिसरात कोयत्याने आणि गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्या प्रकरणात गणेश कोमकर, सोम्या गायकवाड आणि इतर आरोपी आहेत. गणेश कोमकरची पत्नी ही कुख्यात बंडू आंदेकरची मुलगी आहे आणि ती स्वतः वनराजच्या खून प्रकरणात आरोपी आहे. त्यामुळे, आंदेकर-कोमकर कुटुंबीयांचे संबंध आधीच ताणले गेले होते.
वनराजच्या खुनानंतर त्याच्या अंत्यविधीवेळी आंदेकर टोळीच्या सदस्यांनी मोठी शपथ घेतली होती. त्यांनी शस्त्रपूजन करून जाहीरपणे वनराजच्या खुनाचा बदला घेण्याचे वचन दिले होते. याची माहिती पुणे पोलिसांना आणि गुन्हे शाखेलाही होती. यामुळेच पोलिसांनी भविष्यात होणाऱ्या हल्ल्यांची शक्यता गृहीत धरली होती.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
पोलिसांच्या सतर्कतेमुळे काही दिवसांपूर्वी एक मोठा कट उधळण्यात आला होता. भारती विद्यापीठ परिसरात आंदेकर टोळीने एका खुनाचा कट रचला होता. या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांना अटक केली होती आणि 5 पिस्तूलांपैकी 2 जप्त केली होती. मात्र, नाना पेठेतील हा कट पोलीस उधळू शकले नाहीत.
शहरात कडेकोट बंदोबस्त असतानाही भर गर्दीत हा प्रकार घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गुन्हे शाखेची सहा पथके आरोपींचा शोध घेत असून, लवकरच आरोपींना पकडण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका! -
वयाच्या 30व्या वर्षीच विसरभोळेपणा वाढलाय? सावधान 'ब्रेन' हा आजार असू शकते, जाणून घ्या लक्षणे -
संभाजीनगरात पंचायत समिती निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा; अंबादास दानवेंचा भाजप उमेदवारावर हल्ला







Click it and Unblock the Notifications