राष्ट्रपतींचा पुरुषांना सल्ला म्हणाल्या - कुटुंबातील महिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी सहकार्य करा
देशात तीन कोटी महिला लखपती दिदी बनवण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य असून महाराष्ट्रात २५ लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचे उद्दीष्ट येथील राज्य सरकारने ठेवले आहे. महिलांसाठी सुरु असलेल्या योजनांबद्दल मी समाधानी असून पुरुषांनी महिलांच्या क्षमतांना ओळखून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी पुर्ण सहकार्य करावं तसंच महिलांनी त्यांचे आरोग्याची काळजी घ्यायला हवी असा सल्ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दिला.
महाराष्ट्र शासनाच्या महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

ध्यानसाधनेला महत्व
द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, भारतीय परंपरेत ध्यानसाधनेला महत्व आहे. ध्यानचे महत्व आजच्या धकाधकीच्या काळात वाढले आहे. देशाच्या विकासासाठी आजचा कार्यक्रम हा महत्वपुर्ण टप्पा आहे. महाराष्ट्रात महिला केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेच्या लाभ घेत असून त्या आत्मनिर्भर बनत आहेत. राज्य सरकार स्वंयसहायता समुहाद्वारे महिलांना वित्तीय स्वायतत्ता प्रदान केले जात आहे.
महिलांच्या विकासाचे दोन पैलू
द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, राज्य सरकार पारदर्शकतेसाठी प्रयत्नशील आहे. हे मला सांगण्यात आलं आहे. महिलांच्या आर्थिक विकासाचे दोन पैलू आहे त्यात आर्थिक समावेशकता आणि आर्थिक सशक्तीकरण लाडकी बहिण योजनेद्वारे रा्ज्य सरकार आर्थिक सहाय्य करत आहे. महिलांचे देशात जनधन योजनेत ३० कोटी खाते आहेत. महिलांबाबत सुरु असलेल्या योजनांबद्दल मला समाधान आहे.
महाराष्ट्रात 25 महिलांना लखपती दिदी बनवण्याचे स्वप्न
द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, देशात आज योजनेअंतर्गत एक कोटी महिला लखपती दिदी बनल्या आहेत. भारत सरकारचं लखपती दिदी बनवण्याचे लक्ष तीन कोटी आहे. 25 महिलांना लखपती दिदी बनवण्याचे स्वप्न महाराष्ट्र सरकारचे असून त्यांनी तसे उद्दीष्टही ठेवले आहे.
महाराष्ट्रातील महिलांनी पुढे जायला हवे
महिलांनी स्वतःची आरोग्यविषयक काळजी घ्यायला हवी. महाराष्ट्रातील महिलांचे नाव देशात सुवर्णअक्षरांनी कोरलेले आहे. सावित्रीबाई फुले, जिजामाता, संत बहिणाबाई या याच भुमीतील महान संत होत्या. महान कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनी मानवी समाजाचे चित्रण करणाऱ्या कविता लिहिल्या. सिंधूताई सपकाळ यांनी समाजकार्याद्वारे अनाथांची माय बनली अशा महान मातांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील महिला पुढे जातील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, प्रत्येक मुलगी कठीण काळातून संघर्ष करत लक्ष्य साध्य करत आहे. महिलांचा सन्मान करावा, प्रत्येक परिवारात हे दिसायला हवे. महिलांत आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे, असंही त्या म्हणल्या.
बुद्ध विहाराचे लोकार्पण
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण तसेच फीत कापून बुद्ध विहाराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती यांनी विहारातील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बुद्ध वंदना झाली. वंदनेनंतर उपस्थित बौद्ध भिक्कूंना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चिवर दान केले. बौद्ध भिक्कू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गौतम बुद्धांची मूर्ती भेट दिली. क्रीडा मंत्री बनसोडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
ध्यानकेंद्रात बाराशे अनुयायांची बैठक व्यवस्था
लोकार्पण झालेले उदगीर येथील बुद्ध विहार हे कर्नाटक येथील कलबुर्गीच्या बुद्ध विहाराची प्रतिकृती आहे. एक हेक्टर १५ जागेवर या विहाराची उभारणी करण्यात आली आहे. विहारात बाराशे अनुयायांची बैठक व्यवस्था असलेले ध्यान केंद्र तयार करण्यात आले आहे. विहार परिसरात प्रवेश करण्यासाठी एक मुख्य प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराची रचना बिहारमधील सांची स्तूपाप्रमाणे करण्यात आली आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications