मराठा- ओबीसी आरक्षण संघर्षानंतर प्रकाश आंबेडकर यांचा मोठा निर्णय, वाचा पुढे काय होणार
छत्रपती संभाजीनगर - राज्यात मराठा-ओबीसी आरक्षण संघर्ष सुरु असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा निर्णय आज जाहीर केला आहे. प्रकाश आंबेडकर राज्यात आता एससी, एसटी, ओबीसींच्या हक्कासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणुका काही महिन्यावर असताना त्यांचा हा निर्णय राजकारण ढवळून काढणारा ठरणार आहे.
आरक्षण बचाव यात्रा काढणार
प्रकाश आंबेडकर हे आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. या यात्रेला 25 जुलैला दादर चैत्यभूमी इथून सुरुवात होणार आहे. यानंतर ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना येथे जाईल. त्यानंतर 8 ऑगस्टला तारखेला या यात्रेची छत्रपती संभाजीनगर येथे सांगता होणार आहे.

राजकीय पक्षांची भूमिका काय?
प्रकाश आंबेडकर म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद श्रीमंत मराठ्यांनी लावला आहे. काय स्वरुप होईल याची भीती अनेक ओबीसी संघटना आणि नेत्यांना आहे. जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची सुरुवात केली. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीला सर्व मराठा नेते एनसीपीचे, काँग्रेसचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपस्थित नव्हते. त्यामुळे त्या बैठकीत राजकीय पक्षांची भूमिका काय? हा प्रश्न आहे.
सामंजस्याने तोडगा हवा
वंचित बहुजन आघाडीने सर्वच राजकीय पक्षाला आरक्षणाबाबत प्रश्न विचारला. सामंजस्याने तोडगा काढायचा असेल तर श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आणि उद्धव ठाकरे गट आहे. हे पक्ष जोपर्यंत भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत तोडगा निघणार नाही", असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
वंचितला सीएमचे पत्र मिळाले नाही
प्रकाश आंबूेज"सऱ्या बाजूला या बैठकीत मुख्यमंत्र्यांना वंचितकडून विनंती करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी या राजकीय पक्षाच्या नेत्यांना व्यक्तिगत पत्र लिहावे. या प्रश्नावर म्हणजे जरांगे यांची जी मागणी आहे, मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या ही मागणी आहे, त्याबाबत राजकीय पक्षांची भूमिका काय आहे, त्याची विचारणा करून मग समान तोडगा काढता येईल. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की पत्र पाठवू. अजून पर्यंत वंचित आघाडीला ते पत्र मिळाले नाही. इतर पक्षांना मिळालं का याचा आमच्याकडे खुलासा नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे
प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, मुंबईत चैत्यभूमी इथून या यात्रेला प्रारंभ होणार आहे, विदर्भ तसेच मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यात मार्गक्रमण करत, आठ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे यात्रेची सांगता होणार आहे. ओबीसी आरक्षण वाचायला पाहिजे, एसटी एससी शिष्यवृत्ती वाढ झाली पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना एसटी एससी शिष्यवृत्ती लागू झाली पाहिजे तसेच जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे.
या मागण्यांचा या यात्रेच्या माध्यमातून प्रचार करणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. यासाठी यात्रेदरम्यान ठिकठिकाणी कॉर्नर बैठका तसेच मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा घेणार असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.












Click it and Unblock the Notifications