PM मोदींनी 20 उद्योगपतींचं 16 लाख कोटींचं कर्ज माफ केलं! राहुल गांधींचा मोठा आरोप
Rahul Gandhi: "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 20 ते 25 उद्योगपतींचं 16 लाख कोटींचं कर्ज माफ केलं आहे, असा मोठा आरोप काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी आज केला, ते सांगलीत आयोजित सभेत बोलत होते.
चायनीज माल देशात आयात केला जात असून त्याची विक्री अदानी आणि अंबानी करत आहेत. यामुळे अशा उद्योगपतींचा फायदा होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्केटींग होत असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलं.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी म्हणाले, "अदानी-अंबानी रोजगार देऊ शकत नाही. रोजगार छोटे छोटे कंपनीवाले, उद्योजक देऊ शकतात. देशात चायनाचा माल आणला जातो त्यातून हा माल विक्री करणाऱ्या फायदा अदानी, अंबानीचा फायदा आणि नरेंद्र मोदींचं मार्केटींग होत आहेत.
देशात दोन हिंदुस्तान..
राहुल गांधी म्हणाले, "देशात एक उद्योगपतींचा आणि दुसरा गरीबांचा असे दोन भारत होत आहेत. वीस पंचवीस उद्योगपतींचं सोळा लाख कोटी रुपयांचं कर्ज नरेंद्र मोदी यांनी माफ केलं आहे. शेतकऱ्यांचं आतापर्यंत कर्ज माफ केलेल नाही. आमचं सरकार होतं तेव्हा शेतकऱ्यांचे सत्तर हजार कोटींचं कर्ज माफ केलं होतं."
महाराष्ट्रातील उद्योग पळवले
राहुल गांधी म्हणाले, "काँग्रेसचे कार्यकर्ते महाराष्ट्रात आपले सरकार आणत आहेत हे मला माहीत आहे. दुसऱ्या राज्याचे लोक येथे येतात आणि तुमचे उद्योग तिकडे पळवतात. महाराष्ट्रात शेतकरी, किसान आणि बेरोजगारांनी होरपळलेल्यांची सरकार आपण आणणार आहोत. हे मला माहीत आहे."
ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांची पाठ
डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व स्मारक लोकार्पण कार्यक्रम आज सांगलीत झाला. यावेळी आयोजित सभेत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि अन्य नेत्यांची अनुपस्थिती होती. यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. महाविकास आघाडीतील नेते शरद पवार उपस्थित असताना ठाकरे गटाचे नेते अनुपस्थित असल्याने उलटसुलट चर्चाही पुढे येत आहेत.
नाना पटोलेंचे वक्तव्य..
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी आपले मत व्यक्त केलं. पटोले म्हणाले, पतंगराव कदम हे आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे. राजकारणात ज्याच्याकडे पैसे तोच येऊ शकतो अशी आता स्थिती आहे.
शरद पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात योगदान देणारे सर्व नेते स्वातंत्र्य चळवळीतील होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याचा अर्थ काय तर ते या नेत्यांना समजला होता. यात अनेकांची नावे घेता येतील ज्यांनी सामान्य लोकांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य खर्च केलं.












Click it and Unblock the Notifications