PM Modi: मागच्या सरकारनं ST, SC, OBC वर्गाला जाणून बुजून पुढं येऊ दिलं नाही, मोदींची काँग्रेसवर टीका
PM Modi : "मागच्या सरकारने एससी, एसटी, ओबीसी वर्गाला जाणून बुजून पुढं येऊ दिलं नाही," असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत "आम्ही सरकारी पद्धतीनं काँग्रेसच्या मागास विचाराला संपवलं," असं त्यांनी वक्तव्य केलं आहे. विश्वकर्मा योजनेच्या वर्षपुर्तीनिमित्त वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
मागासवर्गीय उद्योजक व्हावो - पंतप्रधान मोदींचे उद्दीष्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आज विश्वकर्मा योजनेचा सर्वात जास्त लाभ एसटी, एससी आणि ओबीसी समाज घेत आहे. या समाजातील लोक विश्वकर्मा योजनेतून केवळ कारागिरच बनावे असे नाही तर ते उद्योजक बनावे त्यासाठी आम्ही स्माॅल स्केल इंडस्ट्रीजचा दर्जा दिला. ".

मागासवर्गांचं अर्थव्यवस्थेत मोठं योगदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आमचे उद्दीष्ट हे आहे की, या वर्गातील लोक उद्योजक व्हावे आणि त्यातच छोट्या छोट्या व्यावसियाकांचे उत्थान व्हावे. जो वर्ग आर्थिकदृष्ट्या मागे राहत होता तोच वर्ग आ ता जगातील तिसऱ्या आर्थिक महासत्ता असलेल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी विदर्भातील वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी 'पीएम विश्वकर्मा' कार्यक्रमात सहभाग घेतला. पंतप्रधान मोदी सकाळी साडेअकरा वाजता 'राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा' कार्यक्रमात सहभागी झाले . कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वाटप केलं, यासोबतच ते एका टपाल तिकिटाचे अनावरणही त्यांनी केलं
पंतप्रधान मोदी अमरावतीमध्ये पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन आणि ॲपेरल पार्कची पायाभरणीही करणार आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे एक हजार एकर क्षेत्रफळाचे हे उद्यान विकसित केले जाणार आहे. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेअंतर्गत 15 ते 45 वयोगटातील लोकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील दीड हजारांहून अधिक तरुणांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीत विदर्भाचा निकाल कसा होता?
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकली तर विदर्भातील लोकसभेच्या 10 जागांपैकी भाजपला फक्त दोन जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसने पाच जागा जिंकल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (उबाठा) एक जागा जिंकली आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एक जागा जिंकली आहे.
भाजपचा मित्रपक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ एक जागा मिळाली होती. 2019 च्या दृष्टीने काँग्रेसला 4 जागा मिळाल्या, तर भाजपने 3 जागा गमावल्या आणि शिंदे यांच्या शिवसेनेला 2 जागा कमी झाल्या.
विदर्भाने भाजपचे टेन्शन वाढवले
विदर्भात भाजपसाठी राजकीय टेन्शन वाढले असून काँग्रेससाठी आशेचा किरण आहे. अशा स्थितीत भाजप नेत्यांनी पक्ष सोडण्याची प्रक्रियाही तीव्र झाली आहे. विदर्भातील दिग्गज नेते गोपालदास अग्रवाल यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळेच पंतप्रधान मोदींनी स्वतः पदभार स्वीकारून वर्ध्यातील जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण नरेंद्र मोदींच्या आगमनानंतरच भाजपने राष्ट्रीय राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते.
अशी होती विदर्भात भाजपची कामगिरी
विदर्भावर आपली मजबूत पकड कायम ठेवण्यासाठी भाजपने येथील जातीय समीकरणही आपल्या बाजूने बदलण्याचे काम केले होते. याचाच परिणाम म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातील एकूण 62 विधानसभा जागांपैकी 44 जागा जिंकण्यात भाजपला यश आले. शिवसेनेला 4, काँग्रेसला 10, राष्ट्रवादीला 1 आणि इतरांना 4 जागा मिळाल्या. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात भाजपने 29 तर शिवसेनेने 4 जागा जिंकल्या. विदर्भात काँग्रेसला 15 तर राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्या होत्या. याशिवाय 8 जागा इतरांनी जिंकल्या.
2019 च्या निवडणुकीत धक्का
विदर्भात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसला होता, तेव्हा त्यांना 15 जागांचे नुकसान सहन करावे लागले होते. यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गमावलेली राजकीय जागा पुन्हा मिळवण्यात काँग्रेसला यश आल्याचे दिसत आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मतदारच नव्हे तर नेतेही कमबॅक करत आहेत. त्यामुळेच गेल्या दहा वर्षांपासून भाजपसाठी मजबूत असलेल्या विदर्भाच्या बालेकिल्ल्याला तडा जाऊ लागला असून भाजपसाठी राजकीय टेन्शन वाढले आहे.
विदर्भाचे राजकीय महत्त्व
महाराष्ट्राच्या राजकारणात विदर्भाचे स्थान नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. काँग्रेसच्या राजकीय वर्चस्वामुळे या विदर्भात आपली पाळेमुळे रोवण्यासाठी भाजपला बराच काळ संघर्ष करावा लागला आहे. विदर्भातील सर्वात मोठे शहर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरातून येतात आणि प्रतिनिधित्व करतात. अशा स्थितीत भाजपसाठी विदर्भाचे राजकीय महत्त्व समजू शकते, पण काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे नाना पटोलेही याच भागातून येतात.












Click it and Unblock the Notifications