Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पंतप्रधान मोदींनी मागितली छत्रपती शिवाजी महाराजांची माफी, म्हणाले- मी नतमस्तक होऊन....

सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2023 मध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. पण अवघ्या आठ महिन्यात शिवरायांचा पुतळा कोसळला. आता वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजांची माफी मागितली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

भारतीय जनता पार्टीने 2013 मध्ये भारतीय जनता पार्टीने मला पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले तेव्हा मी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर बसून प्रार्थना केली होती. मी राष्ट्रसेवेच्या नवीन प्रवासाचा आरंभ केला होता. मागील काही दिवसांत सिंधुदुर्गमध्ये जे झालं माझ्यासाठी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी दु:खदायक होते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही ते आराध्य दैवत आहे आणि मी आज नतमस्तक होऊन माझे आराध्य दैवत छत्रपती शिवाजामहारांजांची माफी मागतो.

Pm Narendra Modi

आमचे संस्कार वेगळे आहेत आणि आम्ही जे लोक नाही जे दर दिवशी वीर सावरकरांसारख्या राष्ट्र पुत्राचा अपमान करतात सावरकरांचा अपमान करूनही माफी मागत नाही. कोर्टात जातात, पण त्यांना पश्चात्ताप होत नाही. हे यांचे संस्कार आहे. मी इथे आल्यावर शिवाजी महाराजांच्या चरणावर डोकं टेकवून माफी मागत आहे. जे लोक शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतात त्यांची पूजा करतात त्यांचीही मी माफी मागतो, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजचा दिवस महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवासातील ऐतिहासिक दिवस आहे विकसित महाराष्ट्र विकसित भारताच्या संकल्पनेचा महत्वाचा हिस्सा आहे त्यामुळे मागील दहा वर्षात किंवा माझ्या सरकारचा हा तिसरा कार्यकाळ महाराष्ट्राचे हिताचे सतत मोठे निर्णय घेण्यात आले महाराष्ट्राकडे विकासासाठी आवश्यक सामर्थ्य आणि संसाधन येथील समु्द्रकिना-याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा इतिहास आहे वाढवण बंदर हे जगातील सगळ्यात मोठ्या दहा बंदरापैकी एक असेल. आज देशातील सगळ्या बंदरांवर जेवढ्या कंटेनर्सची वाहतूक होते तितक्या कंटेंनर्सची वाहतूक एकट्या वाढवण बंदरातून होईल. हे बंदर महाराष्ट्र आणि देशाच्या व्यापाराचे औद्योगिक प्रगतीचे मोठे केंद्र बनणार आहे

दिघी बंदराच्या विकासालाही परवानगी

पंतप्रधान आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, आमच्या सरकारने दोन-तीन दिवसांपूर्वीच दिघी बंदराच्या क्षेत्राच्या औद्योगिक विकासाला परवानगी दिली आहे ही महाराष्ट्राच्या लोकांसाठी डबल खुशखबरी आहे. हे औद्योगिक क्षेत्र छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड मध्ये विकसित होणार आहे यामुळे हे महाराष्ट्राची नवीन ओळख निर्माण होणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील दिघी बंदर असेल. या बंदरामुळे औद्योगिक क्षेत्र, पर्यटन आणि इको रिसोर्स क्षेत्रालाही प्रतिसाद मिळेल.

वाढवण बंदरावर जगाची नजर

मोदी म्हणाले, हा नवीन भारत आहे, इतिहासातून धडा घेतोय. आपल्या सामर्थ्याला, गौरवाला ओळखतो. गुलामीच्या बेड्या तोडून नवे मैलाचे दगड तयार करत आहे. मागील दशकात भारताच्या समृद्धीला, विकासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे आम्ही बंदरे आधुनिक बनवली आहेत, जल मार्ग विकसित केले, लोकांना रोजगार मिळावा यावर भर दिला. लाखो कोटींची गुंतवणूक केली आहे अनेक बंदरांची क्षमता दुप्पट झाली आहे. गुंतवणुक वाढली आहे जहाजांच्या वेळाही कमी झाल्या आहे, याचा लाभ उद्योग व्यापाराला होत आहे खर्च कमी होतो. याचा लाभ युवकांनाही होतो, त्यांना नवीन संधी मिळत आहेत नाविकांच्या सुविधा देखील वाढल्या आहेत, आता मात्र वाढवण बंदरावर जगाची नजर आहे, कारण या बंदराची बरोबरी करणारे खूपच कमी बंदरे जगात आहेत

महाराष्ट्राच्या प्रगतीत काही लोक आडवे

मोदी पुढे म्हणाले की, या पूर्ण क्षेत्राचे चित्र बदलत आहे. वाढवण बंदराचा सर्वात जास्त लाभ महाराष्ट्रातील लोकांना होईल. महाराष्ट्राचा विकास माझी प्राथमिकता आहे. मेक इन इंडिया चा लाभ महाराष्ट्राला होतोय. महाराष्ट्र भारताच्या प्रगतीत खूप मोठी भूमिका निभावत आहेत पण दुर्भाग्य हे आहे की महाराष्ट्र विरोधी लोकांनी तुमच्या विकासाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे.

वाढवणचा प्रकल्प इतकी वर्षे का रोखला?

या प्रकल्पाला साठ वर्षे लटकवले एवढ्या मोठे आवश्यक काम सुरूही होऊ दिलं नाही, पण जेव्हा 2014 मध्ये केंद्रात आमचं सरकार निवडून आलं त्यानंतर राज्यात 2016 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीसांचे सरकार आलं त्यांनी तेव्हाच यावर गंभीरतेने काम सुरू केलं बंदर निर्माण करण्याचा निर्णय घेतला पण पुन्हा 2019 मध्ये अडीच वर्षापर्यंत इथे पुन्हा काही काम झालं नाही. आज इथे बारा लाख नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. महाराष्ट्राचा विकासावर कोणाला आक्षेप होता? ते कोण लोक होते जे महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावत होते? ज्यांना महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळू द्यायचा नव्हता? ही गोष्ट महाराष्ट्र जनतेने विसरू नये. कारण ते लोक महाराष्ट्राला मागे ठेवी इच्छितात. पण आमचे केंद्रातील एनडीएचे आणि राज्यातील महायुतीचे सरकार महाराष्ट्राला देशात सगळ्यात पुढे घेऊन जाऊन इच्छित आहे.

भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मासे उत्पादक देश

मच्छीमार बांधवांसाठी 700 कोटी पेक्षा जास्त योजना तयार केल्या आहेत. देशातील वेगवेगळ्या 400 कोटींपेक्षा जास्त योजनांचे उद्घाटन इथूनच झाले. कोट्यावधी मच्छिमारांचे जीवन या अशा अनेक योजनांमुळे बदलले आहे. मच्छिमार बंधू-भगिनींचे विशेषकरुन आपल्या महाराष्ट्रातील मच्छिमारांचे मासेमारीत क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे मागील दहा वर्षांत मासे उत्पादन दुपटीने वाढले आहे. भारत जगातील दुसरा सगळ्यात मोठा मासे उत्पादक देश बनला आहे 2014 मध्ये 80 लाख होते ते आता 170 लाख मेट्रिक टनांपर्यंत पोहचले आहे. आमच्या सरकारच्या निरंतर प्रयत्नामुळे कोट्यावधी मच्छीमारांचे उत्पादन वाढले हे याचे जिवंत उदाहरण आहे असेही मोदी म्हणाले.

मासेमारीत महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर

आमचे सरकार मासे उत्पादनात महिलांची भागीदारी वाढवण्याचे काम करत आहे. हजारो महिलांना मदत दिली गेली आहे मासेमारीसाठी आधुनिक टेक्नॉलॉजी देखील वापरण्यात आहे, धोके कमी करण्याचे प्रयत्न सरकार करत असून मासेमारी जहाजांवर एक लाख ट्रान्सपोर्टर लावणार आहे यामुळे मच्छिमार जहाजे संदेश किनाऱ्यावर पाठवू शकतील.

110 पेक्षा जास्त मासेमारी बंदरे

मच्छीमार जहाज सुरक्षित परतावित यासाठी 110 पेक्षा जास्त मासेमारी बंदरे आणि लँडिंग सेंटर बनवले जात आहेत प्रोसेसिंग ची व्यवस्था देखील केली जात आहे. नावेसाठी कर्ज योजना योजना, पीएम मत्स्य संपदा योजना मच्छीमारांसाठी त्यांच्या हितासाठी बनवल्या आहेत आम्ही किनाऱ्यावरील गावांच्या विकासासाठी अधिक लक्ष देत आहोत मच्छिमारांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी मच्छीमार सहकारी संस्था देखील मजबूत करण्यात येत आहेत असेही मोदींनी सांगितले.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+