पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या! कुटुंबीयांचा हत्येचा गंभीर आरोप, वाचा काय आहे प्रकरण?
Pankaja munde pa wife death : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २२ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. मात्र, या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, आत्महत्या केलेल्या तरुणीच्या कुटुंबियांनी थेट ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. गुन्हा दाखल व्हावा यासाठी मुलीचे कुटुंबीय उरळी पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत. ही घटना आणि त्यानंतर कुटुंबीयांनी केलेले आरोप यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय आहे?
सोलापूर येथे पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नीने, शनिवारी २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास, वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचा विवाह ७ फेब्रुवारीला विवाह झाला होता.
कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दोघांचे लग्न काही महिन्यांपूर्वीच झाले होते. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच ही दुर्दैवी घटना घडल्याने अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम तूर्तास रद्द केले असल्याची माहिती समोर आली आहे.
आत्महत्या की हत्या? कुटुंबियांचा गंभीर आरोप आणि मागणी
आत्महत्या केलेल्या तरुणीच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुलीच्या मामांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. यामध्ये शनिवारी २२ नोव्हेंबर २०२५ दुपारी एक वाजल्यापासून अनंत गर्जे आणि त्यांच्या पत्नीमध्ये भांडण सुरू होते. विवाहीतेच्या पतीचे बाह्य संबंध होते, असे म्हटले आहे.
ही बाब पत्नीला समजली त्यांनी अनंत गर्जे यांच्या चॅटिंगचे पुरावे वडिलांना पाठवून ठेवले होते. 'तिने माझ्यासमोर आत्महत्या केली' असे अनंत गर्जे यांचे म्हणणे आहे; मात्र, यावर पत्नीच्या माहेरच्यांचा कुटुंबीयांचा विश्वास नाही. मुलीच्या कुटुंबीयांची मागणी आहे की, पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि घटनेची सखोल चौकशी करावी. या मागणीसाठी मुलीचे वडील आणि मामा शनिवार रात्रीपासून) वरळी पोलीस ठाण्यात होते.
गुन्हा दाखल करण्याची मागणी, पोलिसांचा तपास सुरु
मृत तरुणीच्या कुटुंबीयांचा गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह कायम आहे. आत्महत्या केलेल्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल (पोस्टमार्टम रिपोर्ट) प्राप्त झाल्यावर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. वरळी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत आणि घटनेचा सखोल सहभागी तपास (प्रत्येक बाजूने तपास) सुरू आहे.












Click it and Unblock the Notifications