पंढरपूरच्या आषाढी वारीबाबत माहित नसलेल्या 'या' 5 महत्वपूर्ण गोष्टी घ्या जाणून
मुंबई - आषाढी वारी ही एक महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे, आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेले समस्त वारकरी पायी जाऊन पंढरपूरची वारी करतात. ही वारी जागतिक स्तरावरही आता पोहचली आहे. या वारीला मोठे महत्व आहे पण तुम्हाला वारीबद्दल या पाच गोष्टी माहीत आहेत का? नसेल माहीत तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
चला तर या 5 गोष्टी वाचा आणि जाणून घ्या की,वारी कधी सुरु झाली. कुणी सुरु केली आणि आता वारीला किती लोक पंढरपूरला येतात.

पहिली गोष्ट
संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा तिसरा मुलगा नारायण महाराज यांनी 1685 साली पहिली वारी केली. तेव्हा ते आळंदीहून संत ज्ञानेश्वरांच्या आणि देहूवरुन संत तुकारामांच्या पादुका घेऊन पंढरपूरला गेले होते. यावर्षी वारीचा 333 वा पालखी सोहळा आहे.
दुसरी गोष्ट
सध्याच्या वारीची रचना हैबतबाबा यांनी केलेली आहे. ते सातारा जिल्ह्यातील आरफळ या गावचे देशमूख होते. त्यांनी लावलेल्या शिस्तीनुसार, त्याकाळच्या 27 दिंडया पालखीपुढे चालतात आणि त्यानंतर अस्तित्वात आलेल्या दिंड्या पालखीमागे चालतात. आजघडीला 200 पेक्षा जास्त नोंदणीकृत दिंड्या असून त्या पंढरपूरला जातात.
तिसरी गोष्ट
2 लाख भाविकांनी सुरु होणार हा सोहळा आषाढी एकादशीला 10 लाख वारकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होतो. यामध्ये गुजरात, गोवा, कर्नाटकातूनही दिंड्या सहभागी होतात.
चौथी गोष्ट
नेहमी सरासरी 600 ते 700 रुपयांचा रोज व्यवसाय होणारा किरकोळ व्यापार वारीच्या काळात 17 ते 20 पटीने वाढतो आणि रोज तो 11 ते 13 हजार रुपये इतका होतो. हा एकप्रकारे स्थानिकांच्या व्यवसायात भर टाकणारा उत्सवही ठरला आहे.
पाचवी गोष्ट
धावा म्हणजे धावणे असे मानले जाते की, पंढरपूरला पायी जाताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोट्या टेकडीवरुन विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि त्या ओढीने ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी ते तेथून पंढरपूरला धावत गेले. याचे ही आठवण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.












Click it and Unblock the Notifications