हाके आणि वाघमारे यांची भाषा मुद्याला धरुन,मी त्यांच अभिनंदन करते- पंकजा मुंडे

मुंबई: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या भेटीला आज शनिवारी सरकारचे शिष्टमंडळ पोहोचले.सरकारच्या या शिष्टमंडळाला लक्ष्मण हाके यांची समजूत काढण्यास यश मिळालं आहे.

pankaja munde

या शिष्टमंडळात ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतर 4 मंत्री होते. तसेच इतर 12 जणांचा समावेश या शिष्यमंडळात होता. यानंतर लगेच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी एक पत्रकार परिषद घेतली.

लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण स्थगित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करते. सरकारने त्यांच्या मागण्यांचा नक्कीच सकारात्मक विचार करेल. तसेच त्यांना पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही. जर बोगस कुणबी प्रमाणपत्र दिले गेले असेल तर ते रद्द केले पाहीजे,नसेल तर तसं सांगितलं पाहिजे. त्यात कुणाला अडचण असण्याचं कारण नाही.

हाके यांचं सालस उपोषण आहे. हाके आणि वाघमारे यांची भाषा मुद्याला धरुन आहे. त्यांची भाषा नम्र आहे. त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून रिस्पेक्ट वाटतो. बाकी कोण काय म्हणतंय त्याकडे पाहण्याची गरज नसल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की,माझी शिवशक्ती परिक्रमा चालू होती तेव्हा ही मी म्हटलं आहे की,ओबीसी आणि मराठा हे बहुजन होते. त्यांच्यात भांडण होऊ नये असं मी सांगायचे. मी कोणत्याही मंचावर जाऊन कुणाला काही बोलावं असं मी कधी केलं नाही. आपल्या राज्यात सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे ही माझी भावना आहे. पण आता परिस्थिती वेगळी झाली आहे. त्यातून राज्यकर्तेच मार्ग काढू शकतात. दोन्ही समाजाच्या लोकांनी आपले मुद्दे घेऊन मुखमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसले तर चर्चा होऊन त्यातून मार्ग निघेल, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

आपण संविधानाच्या आधीन आहोत. कोणताही समाज संविधानाच्या वर नाही. दोन्ही बाजूचे लोकं एकत्र बसून मार्ग काढला पाहिजे. माघार घेण्याचा प्रश्नच नाही. संविधानात जे लिहिलंय त्या चौकटीत झालं पाहिजे. त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्न नाही.संविधानामध्ये जे लिहिलं आहे, त्या चौकटीतच या गोष्टी होत असतात.आम्ही किती लेखी शब्द देऊन उपयोग होत नसतो.त्यामुळे माघार कोणी घेतली न घेतली याचा मुद्दा नसुन आता एखाद्या समाजाला न्यूनगंड वाटत असेल तर त्याची दखल सरकारने मायबापची भूमिका घेणं आवश्यक आहे ,असंही पंकजा मुंडे म्हणाल्या

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+