कोकण पदवीधरमधून निरजंन डावखरेंची विजयाची हॅट्रीक
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी २६ जून रोजी पार पडलेल्या मतमोजणीना निकाल आज १ जुलै (सोमवारी) जाहीर झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही निवडणूक महायुती आणि महाविकासआघाडी दोघांसाठी अतिशय महत्त्वाची मानली जात होती.
कोकण पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी सलग तिसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांचा पराभव करत निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅट्रीक पूर्ण केली आहे.

कोकणातील पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी सलग तिसऱ्यांदा दाखविलेल्या विश्वासाबद्दल आपण त्यांचा आभार मानतो अशी प्रतिक्रिया निरंजन डावखरे यांनी दिली. याबाबत सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केली आहे. महायुतीचे कोकणातील सर्व पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते यांनी अथक मेहनत घेतल्यामुळेच महायुतीला यश मिळविता आले.
हा विजय आपण महायुतीच्या सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना समर्पित करतो अशी प्रतिक्रिया निरंजन डावखरे यांनी दिली आहे.
कोकणातील पदवीधर व शिक्षक मतदारांनी माझ्यावर सलग तिसऱ्यांदा दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचा ऋणी व कृतज्ञ आहे. आपल्या सर्व मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा अथक प्रयत्न करेल.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारत २०४७ घडविण्याबरोबरच कोकणातील शाळांमध्ये… pic.twitter.com/UDNUFYaJf6
— Niranjan Davkhare (@niranjandtweets) July 1, 2024
कोकणातील पदवीधर व शिक्षक मतदारांनी माझ्यावर सलग तिसऱ्यांदा दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचा ऋणी व कृतज्ञ आहे. आपल्या सर्व मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा अथक प्रयत्न करेल.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारत २०४७ घडविण्याबरोबरच कोकणातील शाळांमध्ये… pic.twitter.com/UDNUFYaJf6
डावखरेंचा विजय अन् रवींद्र चव्हाणांची बोलकी प्रतिक्रिया
निरंजन डावखरेंच्या विजयावर भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, निरंजन डावखरे यांनी हॅट्रीक केली आणि प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत. त्यामुळे कोकण आता 100 टक्के महायुतीचं झालं आहे. महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली. डावखरेंचा विजय ही कामाची पोचपावती आहे. मुंबई आणि मुंबई संदर्भात जे कोणी बोलत आहेत त्यांना बोलण योग्य नाही. मात्र लवकरच विधानसभा आहे, त्यावेळी समजेल असा इशारा चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे महाविकासआघाडीला दिला आहे.
मुंबईत ठाकरेंचाच बोलबाला
मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांचा 44 हजार मतांनी विजय झाला आहे. मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात मुख्य लढत होती.
अनिल परब यांना आतापर्यंत 44,791 मते मिळवून विजयी होण्यासाठी मतांचा कोटा पूर्ण केला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपच्या किरण शेलार यांना 18,771 मते मिळाली असून अनिल परब यांचा 44 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे.
अनिल परब यांना मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. आता भाजप व शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या मतांमध्ये मोठा फरक पडला असून पहिल्या 2 फेरीतच अनिल परब यांनी मतांचा कोटा पूर्ण केला. मतमोजणीच्या 4 फेऱ्या होणार आहेत.












Click it and Unblock the Notifications