Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भाजपासोबत गेल्याने ईडीपासून सुटका झाली, छगन भूजबळ यांच्या दाव्याने राजकीय वर्तूळात खळबळ

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. राजकीय पक्षाकडून आरोप-प्रत्योराप सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तूळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ईडीपासून सुटका व्हावी म्हणूनच भाजपासोबत गेलो असल्याचा दावा राजदीप सरदेसाई यांच्या '2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया' या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

chhagan bhujbal

दरम्यान 'मी ओबीसी असल्यानं केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लावण्यात आली, असं छगन भुजबळ यांनी मुलाखतीत म्हटल्याचं पुस्तकात दावा करण्यात आला आहे. ईडीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर मला पुर्नजन्म झाल्यासारखं वाटतं, असं या पुस्तकात भूजबळ यांनी म्हटलं असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच ईडीपासून सुटका हवी असेल तर आपल्या सगळ्यांना भाजपासोबत जावं लागेलं, अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात होती.

नवाब मलिक, अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागलं. या सोबतच सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अशा विविध नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरे जावे लागले होते. मला, अनिल देशमुख व मलिकांना ईडीने अटक केली होती. अशा वेळी भाजपसोबत गेल्याशिवाय सुटका नाही, अशी भावना राष्ट्रवादीच्या काही नेत्याची झाली होती. हा विषय आम्ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडला. पवारांना हे सारे समजत होते. पण त्यांना भाजपबरोबर जाणं मान्य नव्हतं. तेव्हा अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ईडीपासुन सुटका झाली', अशी भावना भुजबळांनी व्यक्त केली असल्याचं, या पुस्तकात म्हटलं आहे.

या पुस्तकात केलेले दावे छगन भूजबळ यांनी फेटाळून लावले आहेत. ते यासंदर्भात थोड्याच पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडणार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+