Nashik Violence : गंभीर जखमी पोलिसांशी मंत्री योगेश कदमांनी साधला संवाद; डॉक्टरांनाही दिल्या सूचना
Nashik Violence : फडणवीस सरकारमधील गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी नाशिकमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेसंदर्भात मोठा आढावा घेतला. नाशिक घटनेत जखमी झालेल्या पोलिसांशी त्यांनी फोनवरुन संवाद साधला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याचबरोबर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचेही कोतुक केले. त्यांच्या या आढाव्याने नाशिक पोलिसांना धीर मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नाशिकमध्ये नेमकं काय घडलं होतं?
नाशिक शहरात अतिक्रमण हटवण्याच्या कामा दरम्यान, महापालिका कर्मचाऱ्यांना सुरक्षा देणाऱ्या पोलिसांवर असामाजिक घटकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत 31 हून अधिक पोलिस जखमी झाले. परंतु, पोलिसांनी माघार घेतली नाही. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.

परिस्थिती गंभीर असतानाही पोलिस ठाम उभे होते
मिळालेल्या माहितीनुसार, अतिक्रमण हटविण्याच्या घटनेवरुन वाद सुरू झाला. त्यावेळी पोलिसांवर दगडफेक झाली. तरीही पोलिस घटनास्थळावरुन हटले नाही. त्यांनी प्रतिकुल परिस्थितीला तोंड दिले. या घटनेत जखमी पोलिसांवर नाशिक शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
या सर्व घटनेनंतर आता महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या जखमी पोलिसांशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यादरम्यान, कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिसांना प्रोत्साहन देतानाच, प्रतिकूल परिस्थितीत सेवा बजावल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुकही केले.
मंत्र्यांनी डॉक्टरांशी साधला संवाद
मंत्री कदम यांनी जखमी सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव आणि संदीप मिटके या अधिकाऱ्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांनी रुग्णालयात उपस्थित असलेल्या डॉक्टरांशी फोनवरून चर्चा केली आणि सर्व जखमी पोलिसांना तातडीने आवश्यक ती मदत दिली जावी, अशा सूचना दिल्या.
मध्यरात्री दगडफेक झाल्याने तणावाची स्थिती नाशिक शहरात 15 एप्रिल रोजी मंगळवारी रात्री बेकायदेशीर दर्गा हटविण्यासाठी गेलेल्या महानगरपालिका आणि पोलिसांवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना नाईलाजाने अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. द्वारका परिसरातील काठे गल्ली सिग्नजवळ सतपीर दर्गा बांधण्यात आला.
सतपीर दर्गा ट्रस्टची याचिका काय?
स्थानिक नागरिकांच्या तक्रारींनंतर, नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने 23 फेब्रुवारी रोजी या दर्ग्याभोवतीची काही अतिक्रमणे हटवली. यानंतर सतपीर दर्गा ट्रस्टच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
सुनावणीदरम्यान, न्यायालयाला हे दर्गा अनधिकृत असल्याचे आढळून आले. यानंतर, महापालिकेने नोटीस बजावून 15 दिवसांच्या आत सर्व अनधिकृत बांधकामे हटविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यासाठी कर्मचारी गेले होते.












Click it and Unblock the Notifications