भाजपची चहुबाजूंनी कोंडी ! तपोवन वृक्षतोडीविरोधात आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मोठा निर्णय
Nashik Tapovan Tree Cutting : २०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela 2027) तयारीने वेग घेतला असला, तरी तपोवन परिसरात प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १८०० झाडांची कत्तल होणार असल्याची माहिती उघड होताच, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी ११५० एकरांवर हे साधूग्राम उभारले जाणार आहे. मात्र, त्यासाठी होणारी वृक्षतोड अनेक स्तरांवरून तीव्र विरोधाचे कारण ठरली आहे.
सत्ताधारी पक्षाचाही विरोध तीव्र
या वृक्षतोडीविरोधात केवळ विरोधकच नव्हे, तर सत्ताधारी पक्षातील नेतेही सक्रिय झाले आहेत.
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) माध्यमावर भूमिका मांडत, वृक्षतोडीवर समोपचाराने तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली होती. पर्यावरणाचा समतोल राखणे आणि भावी पिढीसाठी पर्यावरण वाचवणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी अधोरेखित केले होते. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या भूमिकेचे त्यांनी समर्थन केले होते.
- आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही (शिंदे गट) या प्रश्नी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वृक्षतोड थांबवण्यासाठी शिंदे गटाची शिवसेना आज (शुक्रवारी) सायंकाळी ४.३० वाजता तपोवन येथे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.
या आंदोलनात विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षाचे घटकही सहभागी झाल्याने, तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे.
विरोधकांकडूनही जोरदार रणशिंग
- यापूर्वीच या वृक्षतोडीला अनेक मान्यवरांनी विरोध दर्शवला आहे.
- अभिनेते सयाजी शिंदे यांनी पर्यावरण रक्षणाची बाजू उचलून धरली आहे.
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या निर्णयावर टीका केली आहे.
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे.
मनसेचेही मोठे आंदोलन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (मनसे) या विरोधाची धार वाढवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या नेतृत्वाखाली उद्या, ६ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता तपोवनातील कमानीजवळ (संभाजीनगर रोड) निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासह शालिनी ठाकरे आणि शशांक नागवेकर हे नेते उपस्थित राहणार आहेत. मनसेने सर्व वृक्षप्रेमींना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या वृक्षतोड वादावर आता सरकार आणि प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
-
JAL दिवाळखोरी प्रक्रिया; रेकॉर्डनुसार अदानींच्या बोलीला CoC आणि लवादाचा पाठिंबा -
अदानी ग्रीन एनर्जीचा जागतिक विक्रम: एकाच वर्षात ५ GW क्षमतेची विक्रमी वाढ! -
VerSe Innovation तर्फे पी. आर. रमेश यांची स्वतंत्र संचालक आणि ऑडिट कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती -
JAL दिवाळखोरी प्रक्रिया; रेकॉर्डनुसार अदानींच्या बोलीला CoC आणि लवादाचा पाठिंबा -
भारताच्या प्रगतीला अदानी पोर्ट्सचा वेग; ५०० दशलक्ष टन माल हाताळणीचा ऐतिहासिक टप्पा पार








Click it and Unblock the Notifications