मुंबईतील अटल सेतूवर ६ महिन्यांतच तडे, नाना पटोलेंकडून पाहणी करत गंभीर आरोप
Mumbai: महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूवर पडलेल्या भेगांची पाहणी केली. निवडणुकीपूर्वी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. "संपूर्ण राज्यात भ्रष्टाचार आहे, आम्ही विधानसभेत भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणे मांडू असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले.
नवी मुंबईतील अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा सेवा अटल सेतूला तडे गेले. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी घटनास्थळी भेट देऊन सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, 'आम्ही जे बोलतोय ते केवळ आरोप नाही, हे दाखवण्यासाठी मी आलो आहे.

सरकार लोकांसाठी काम करत असल्याचे दाखवत आहे, पण इथे भ्रष्टाचार दिसतो. ते आपले खिसे भरत आहेत, पण जनतेचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? "या भ्रष्ट सरकारला कसे हटवायचे याचे नियोजन लोकांनी केले पाहिजे असे यावेळी पटोले म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या खात्यात होताहेत हे प्रकार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात खारफुटीची कत्तल करण्यात आली आहे, एक टेकडीही फोडली असून पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. वसईच्या खाडीत पाईप लाईनचे काम सुरु असताना एक गरिब कामगार २० मीटर खाली दबला गेला, त्याच्यावर हजारो किलो लोखंड पडले.
उच्च न्यायालयाने या सर्व घटनांमध्ये स्वतः लक्ष घालावे असे म्हणत हे सर्व प्रकार मुख्यमंत्री शिंदे यांच्याच खात्यात होत आहेत. सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल काँग्रेस पक्ष या भ्रष्टाचारी सरकारला अधिवेशनात जाब विचारेल, असेही नाना पटोले म्हणाले.
#WATCH | Mumbai: Maharashtra Congress President Nana Patole says, "... There is corruption in the whole state. We will present a lot of examples of corruption (in the Vidhan Sabha). Atal Bihari Bajpayee is respected by the people of India. But the BJP does not hesitate while… pic.twitter.com/e6pjNGmAHB
— ANI (@ANI) June 21, 2024
17,840 कोटी रुपये बांधकाम खर्च
अटल सेतुच्या बांधकामाला अंदाजे 17,840 कोटी रुपये खर्च आला आहे. MTHL हा भारतातील सर्वात लांब पूल आणि देशातील सर्वात लांब सागरी पूल आहे. नवी मुंबईतील उलवेच्या दिशेने बाहेर पडताना सेतूवर तडे गेले. डांबरी रस्त्याच्या एका बाजूला या भेगा पडल्या आहेत. यावर्षी 12 जानेवारीला सेतूचे उद्घाटन झाले होते.
प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीनच महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या "अटल सेतू" पुलास भेगा पडल्याची बाब अतिशय चिंताजनक आहे. मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिहार मध्ये नवनिर्मित पुल कोसळल्याची घटना ताजी असतानाच… pic.twitter.com/NGUrLFinj6
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 21, 2024
२१.८ किमी लांबीचा आणि ६ लेनचा पूल
हा पूल 21.8 किमी लांबीचा आणि 6 लेनचा आहे. हा सेतू समुद्रावर 16.5 किमी लांबीचा आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी लांबीचा आहे. हा देशातील सर्वात लांब पूल आहे. या सेतूमुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना कनेक्टिव्हिटी प्रदान झाली आहे.
यामुळे मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी लागणारा वेळही कमी झाला आहे. मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील कनेक्टिव्हिटीसाठी हा सेतू अधिक चांगला आहे.












Click it and Unblock the Notifications