ठरलं..! महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत नाहीच, बंडखोरांसाठी काँग्रेसची 'ही' रणनिती
महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही. जे काँग्रेसने घोषित केले तेच काँग्रेसचे उमेदवार असतील बाकी जेही असतील ते बंडखोर असून त्यांना पक्षातून काढले जाईल, असा इशारा काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिला आहे. एकप्रकारे बंडोबांना थंड करण्याची रणनिती काँग्रेसने आखली आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीत ज्या जागा झाल्या तिथे थेट फाईट होईल.
काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

रमेश चेन्नीथला म्हणाले, महाराष्ट्रातील सरकार बिनकामाचे आहे, हे जनतेने ओळखले आहे. महाविकास आघाडी शिस्तीने लढत आहे. यावेळी चेन्नीथला आणि इतर काँग्रेस नेत्यांनी महायुती सरकारसंदर्भात एक पुस्तिका दाखवून महाराष्ट्राची या सरकारच्या काळात कशी दुर्गती झाली हे सांगितले. दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या गीताचे अनावरणही करण्यात आलं.
नाना पटोले म्हणाले, महायुती सरकारने उपेक्षितांकडे पाठ फिरवली, राज्यात शेतकरी आत्महत्या होत आहेत . गरीब , मध्यमवर्गीयांच्या मुलांचा विश्वासघात सरकारने केला आहे. सरकारी शाळेत पुस्तके, गणवेश अजूनही मिळालेले नाही. महायुती सरकारने भ्रष्ट व्यवस्था निर्माण केली त्यामुळे राज्यात हजारे शाळा बंद कराव्या लागत आहेत.
नाना पटोले यांनी लाडक्या बहिण योजनेवर टीका करत लाडक्या मित्रांना शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी दिली आहे. शिक्षण, रोजगारासाठी काही केले असे म्हणाले. बंडखोरांची समजूत घालू त्यांना विड्राॅल करु. कुठेही बंडखोरी होता कामा नये एकजुटीने आम्ही निवडणूक लढवणार आहे.












Click it and Unblock the Notifications