मुंबईत ६ तासांत ३०० मीमी पाऊस, शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Mumbai: देशात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने आज 11 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मागील सहा तासांत मुंबईत 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचले होते. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या काही तास उशिराने धावत आहेत.
त्याचबरोबर मुंबईतील सर्व बीएमसी, सरकारी आणि खासगी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पुराचा सामना करण्यासाठी एनडीआरएफचे पथक अनेक जिल्ह्यांमध्ये पोहोचले आहे. मुसळधार पावसामुळे रायगड किल्ल्यावरही अनेक पर्यटक अडकून पडले आहेत.

बीएमसीकडून अपडेट
मुंबई महानगरपालिकेने सोशल मीडियाद्वारे अपडेट दिले आहे. मुंबईत सकाळी १ ते सकाळी ७ या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले, त्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली.
🌧️मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 8, 2024
🏫आज देखील जोरदार…
शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई महानगरपालिकेने मुंबई परिसरातील सर्व बीएमसी, सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर केली.
आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Waterlogged railway tracks between Wadala and GTB stations.
— ANI (@ANI) July 8, 2024
Mumbai has recorded over 300 mm of rainfall from 1 am to 7 am today. More rain is expected during the day as well. pic.twitter.com/B9zzZs1bY4
विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्राचा निर्णय जाहीर केला जाईल, असे बीएमसीने सांगितले आहे
मध्य रेल्वेकडून महत्त्वाची माहिती
मध्य रेल्वेने सकाळी ६.३० वाजता दिलेल्या अपडेटनुसार, मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा सुरू आहेत. उपनगरातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनावश्यक प्रवास टाळण्याच आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
भांडुप आणि नाहूर दरम्यान मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे, पॉइंट्स क्लॅम्पिंग आणि पॅडलॉक करून गाड्या चालवल्या जात आहेत. क्लॅम्पिंग पूर्ण झाले आहे. तर हार्बर लाईन वरील लोकल १०-१५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
Due to heavy rain & High tide in Mumbai, local train movement in the suburban section is effected. kindly avoid travel unless unavoidable.
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) July 8, 2024
पश्चिम रेल्वेची स्थिती काय?
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांसाठी सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या उपनगरी विभागातील मुंबई लोकल सामान्यपणे धावत आहेत. पाण्याचा निचरा करण्यासाठी उच्च क्षमतेच्या जलपंपांचा वापर केला जात आहे. रेल्वे कर्मचारी मुंबईची लाईफलाईन सुरळीत चालू ठेवण्यासाठी विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.












Click it and Unblock the Notifications