मुंबई उपनगरी रेल्वेचा होतोय कायापालट
Mumbai: मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या उपनगरी रेल्वेचा कायापालट करण्यात येतोय. पायाभूत सुविधाना गती देण्यात येत असून नव्या मार्गिका उभारण्यात येत आहेत. अमृत भारत स्टेशन योजना उपनगरी रेल्वेसाठी सहाय्यकरक ठरली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला ५ वी आणि ६ वी मार्गिका काम सुरु आहे, त्यासाठी ८९१ कोटी खर्च करण्यात येणार आहेत. मुंबई सेन्ट्रल ते बोरीवली ६ व्या मार्गीकेचे काम खार ते गोरेगाव पूर्ण करण्यात आले आहे. मुंबई सेन्ट्रल ते बोरीवली ६ व्या मार्गिकेच्या अंतर्गत गोरेगाव ते बोरीवली काम सुरु आहे. त्यासाठी ९१९ कोटींचा खर्च आहे.

बोरीवली ते विरार ५ व्या आणि ६ व्या मार्गीकेसाठी २ हजार १८४ कोटींची गुंतवणूक करण्यात आली. पनवेल कर्जत कॉरिडॉर साठी २ हजार ७८२ कोटींचा खर्च करण्यात येत आहे.
हार्बर लाइनच्या विस्तारीकरणाला वेग
हार्बर लाईनच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी ८२६ कोटींची गुंतवणूक करण्यात येत आहे. विरार डहाणू तिसऱ्या आणि चौथ्या मार्गीकेसाठी ३ हजार ५८७ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत.
ट्रान्स हार्बर वर ऐरोली कळवा एलिव्हेटेड रेल्वेसाठी गुंतवणूक
ट्रान्स हार्बर वर ऐरोली कळवा एलिव्हेटेड रेल्वेसाठी ४७८ कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. कल्याण आसनगाव चौथ्या मार्गिकेसाठी एक हजार ७५९ कोटींचा खर्च करण्यात येत आहे. कल्याण कसारा तिसऱ्या आणि चौथ्या मार्गीकेसाठी एक हजार ५०० कोटी खर्च करण्यात येत आहेत.
कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण
उपनगरी रेल्वे बरोबरच कोकण रेल्वेच्या विकासालाही गती देण्यात आली आहे. या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी 1 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. रोहा पर्यन्त रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण देखील पूर्ण झाले आहे.
अमृत भारत स्टेशन अंतर्गत रेल्वे स्थानकांचा विकास
अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. त्यात मुंबईतील अनेक स्थानाकांचा समावेश आहे. भायखळा स्थानकसह अनेक स्थानकांना आता नवा साज चढणार आहे.












Click it and Unblock the Notifications