Mumbai rain : मुंबईत 5 वर्षातील रेकाॅर्डतोड पाऊस! विदर्भात पुराचा धोका, पावसाने घेतला 6 जणांचा बळी
Mumbai rain Record-breaking rainfall in 5 years in city suburbs : मुंबईत जोरदार पाऊस पडत असून हवामान विभागाने मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. त्यानुसार, भारी वर्षा होत आहे, त्यामुळे शहरातील बहुतांश भागात पाणी साचले आहे.
गेल्या पाच वर्षातील रेकाॅर्डतोड पाऊस
मुंबईत गेले दोन दिवसापासून पाऊस पडत असून सून तब्बल पाच वर्षात शनिवारी मुंबईमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली याआधी ऑगस्ट 2020 मध्ये 268.6 मी पावसाची नोंद झाली होती तर शुक्रवारी सकाळी साडेआठच्या शनिवारी सकाळी साडेआठ या 24 तासांमध्येच 240.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
#WATCH | मुंबई: शहर के कई हिस्सों में बारिश के बाद जलभराव की स्थिति देखने को मिली।
— ANI_HindiNews (@AHindinews) August 16, 2025
वीडियो सायन गांधी मार्केट से है। pic.twitter.com/xiAWZGRRKt
पुणे जिल्ह्यातील या भागाला रेड अलर्ट
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज 17 ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यासाठी घाट विभागात रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर विदर्भात पुराचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यानच वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे.
वाशिम जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी पूर परिस्थिती
वाशीम जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अडाण नदीला पूर आला व मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथे नदीचे पाणी नागरी वस्तीत घुसले. जीवनाश्यक वस्तू पाण्याने भिजल्या, प्रशासनाची तातडीने कार्यवाही रात्रीच नागरिकांना स्थानिक शाळेत हलविले. या मार्गावरील छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहतूक समृद्धी महामार्गे वळविण्यात आली. मालेगाव तालुक्यात जऊळका येथे काटेपूर्णा नदीवरील पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या मार्गावरून नागपूरकडे जाणारी वाहतूक वाशीम मार्गे वळविण्यात आली.
पावसाचे सहा बळी
विदर्भात विविध घटनांमध्ये चौघांचा बळी गेला तर मराठवाड्यातील कळंब तालुक्यात मांजरा नदीला आलेल्या पुरात एक शेतकरी वाहून गेला, तर पावसामुळे भिंत पडून एकाचा मृत्यू झाल्यांचे वृत्त आहे. एबीपी माझाने पावसामुळे सहा बळी गेल्याचे वृत्त दिले आहे, तर यापूर्वी मुंबई पावसाने दोन बळी घेतले आहेत.
सतर्क रहा आणि सुरक्षित रहा!
पुढील २४ तासांत काही पाणलोट आणि परिसरात कमी ते मध्यम स्वरूपाचा पुराचा धोका असल्याचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. हा इशारा आज (१७ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५:३० पर्यंत वैध) वैध राहील असेही हवामान विभागाने म्हटले आहे. मुसळधार पावसाच्या धर्तीवर सुरक्षिततेच्या उपाययोजना करा असेही आयएमडीने म्हटले आहे.
#WATCH | Maharashtra: Waterlogging witnessed in parts of Mahim, Thane as the region receives heavy rainfall. pic.twitter.com/uFMTxCRc5V
— ANI (@ANI) August 17, 2025
या भागात पुराचा धोका..
#WATCH | Maharashtra: Waterlogging witnessed in parts of Mahim, Thane as the region receives heavy rainfall. pic.twitter.com/uFMTxCRc5V
— ANI (@ANI) August 17, 2025आगामी "पुढील २४ तासांत खालील हवामान उपविभागांच्या काही पाणलोट आणि परिसरात मध्यम ते उच्च दर्जाच्या पुराचा धोका संभवतो. कोकण आणि गोवा - उत्तर गोवा, दक्षिण गोवा, मुंबई शहर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि उपनगरीय मुंबई जिल्हे," असे आयएमडीने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
विदर्भात पुराचा धोका असलेले जिल्हे: अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ
१९ ऑगस्टपर्यंत ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) रविवारी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर ठाणे आणि पालघर या शेजारील जिल्ह्यांनाही किमान १९ ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट अंतर्गत ठेवण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications