Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबईसाठी 24 तास धोक्याचे, अतीमुसळधार पावसाचा इशारा! जाणून घ्या राज्यातील इतर शहरांचे हवामान

Mumbai Rain : राज्यातील रत्नागिरीसह अनेक ठिकाणी पाऊस पडत असून मुंबईसाठी आगामी २४ तास धोक्याचे आहेत, हवामान विभागाने मुंबई आणि उपनगरात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मध्यप्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने समुद्रातील वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे कोकणातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आज सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरांमधील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे समुद्रामधील आणि किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे मुंबई आणि किनारपट्टीलगतच्या प्रदेशात पावसाचा जोर आहे.

Mumbai Rain 24 hours warning

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज 16 जुलै रोजी मुंबई आणि उपनगरांमधील काही भागात ढगाळ हवामान राहणार आहे. यावेळी अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे. त्यासोबतच हवामान विभागाने मुंबईसाठी पुढील 24 तास धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे.

मराठवाड्यात पावसाची स्थिती काय?

मराठवाड्यात आज ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर भारतीय हवामान खात्यातील पुणे विभागाचे माजी प्रमुख के. एस. हौसाळीकर यांनी उद्या १७ आणि परवा १८ जुलै रोजी मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे म्हटले आहे.

कोकणात आज पावसाची स्थिती काय

रत्नागिरीत पावसाने कहर केला असून रायगडमध्येही चांगला पाऊस सुरु आहे. दरम्यान, आज १६ जुलै रोजी कोकणात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र आणि पुण्यात आज पावसाची स्थिती काय

मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहेत तर आज पुण्यातही आज पावसाची शक्यता आहे.

विदर्भाची स्थिती काय

विदर्भात आज तुरळक ठिकाणी पावासाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना , विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

रायगडमध्ये पावसाची स्थिती गंभीर

रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आले आहेत.. रोह्यात कुंडलिका आणि नागोठणयात अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे..महाडला सावित्री, रसायनीत पाताळगंगा, पनवेलला गाढी, कर्जतला उल्हास नदी देखील दुथडी भरून वाहत आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्याने काही भागातील वाहतूक बंद पडली असून मदत आणि बचाव पथकांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+