Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पावसाचा फटका! रायगड, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यात आज सुट्टी जाहीर! मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा स्थगित

Mumbai News University exams postponed Holiday declared : राज्यात 21 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे, तर रायगड, रत्नागिरी आणि पालघर येथे रेड अलर्ट होता, आजही रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट आहे, त्यामुळे रायगडसह, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांना आज सु्ट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसे आदेश संबंधित जिल्ह्यांच्या प्रशासनांनी काढले आहे तर मुंबई विद्यापीठाच्या नियोजित परिक्षाही पावसामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Mumbai News University exams postponed Holiday declared

रायगडच्या नागरिकानी सर्तकता बाळगावी - जिल्हाधिकारी

रायगड जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार अतिवृष्टी होणार आहे, या पावसाचा रेड अलर्ट दिल्याने दि.19 ऑगस्ट रोजी मंगळवारी रायगड मधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा(अंगणवाडी, प्राथमिक,माध्यमिक,उच्चमाध्यमिक, महाविद्यालये)बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

रत्नागिरीतही शाळांना आज सुट्टी

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आजही (19 ऑगस्ट) दिवसभर कायम आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल 18 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजताच्या स्थितीनुसार, खेड तालुक्यातली जगबुडी नदी धोका पातळी ओलांडून, तर राजापुरातली कोदवली नदी इशारा पातळी ओलांडून वाहत आहे. हवामान विभागाने 19 ऑगस्टसाठी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर, 19 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातल्या सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

आंबा घाटातील वाहतूक सुरु

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात दरड कोसळल्यामुळे बंद झालेली वाहतूक सुरू करण्यात आली असली, तरी मुसळधार पाऊस कायम असल्याने वाहनचालकांनी घाटातून वाहनं चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. 33 केव्ही वीजवाहिनीत तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने संगमेश्वर तालुक्याच्या मोठ्या भागात जवळपास 21 तास वीजपुरवठा नव्हता. त्यामुळे नागरिकांचे खूप हाल झाले. अति पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या, तसंच रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या.

पालघर जिल्ह्यातल्या शाळा-कॉलेजांना उद्या सुट्टी जाहीर

हवामान विभागाकडून पालघर जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अतिवृष्टीची संभावना लक्षात घेता जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड यांनी उद्या शाळा, कॉलेज आदींना सुट्टी जाहीर केली आहे. पालघर जिल्ह्यात आज दिवसभर मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहे.

मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये यांना आज सुट्टी !

भारतीय हवामान खात्याने उद्या मंगळवार, दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर क्षेत्रातील (मुंबई शहर आणि उपनगरे) सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुटी जाहीर करण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठाने आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

अतिमुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता विद्यार्थीहित आणि संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुधारीत वेळापत्रकानुसार आता या परीक्षा 23 ऑगस्ट २०२५ ला नियोजित वेळेनुसार होणार आहेत. त्या परीक्षांमध्ये मास्टर ऑफ आर्ट कम्युनिकेशन जर्नालिझम सत्र 3, पीआर सत्र 3, टेलेव्हिजन स्टडीज सत्र 3, इलेक्ट्रॉनिक मीडिया सत्र 3, फिल्म स्टडीज सत्र 3, एमपीएड सत्र 2, बीपीएड सत्र 2, बीफार्म सत्र 2, एमफार्म सत्र 2, एमएड सत्र 2, एमकॉम (ईकॉमर्स) सत्र 4, एमए (सीडीओई), बीई ( कम्प्युटर सायन्स अँड डिजाईन, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स) यासह अन्य परीक्षांचा समावेश आहे. या परीक्षांना बसणाऱ्या सर्व संबंधित विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी सुधारीत वेळापत्रकाची नोंद घेण्याचे आवाहन संचालक परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+