Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

गणेशउत्सवाला कोकणात जाण्याची लगबग अन् रत्नागिरीजवळ खासगी बस जळून खाक! मृत्यू डोळ्यासमोर दिसला..

Mumbai News Private bus burnt near Kashedi in Ratnagiri : गौरी गणपतीचा सण अगदी तोंडावर असताना आणि कोकणवासीयांची गावी जाण्यासाठी लगबग सुरु असतानाच रत्नागिरीजवळ एक मोठी दुर्घटना घडली. मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या कशेडी बोगद्याजवळ आज (२४ ऑगस्ट) मध्यरात्री एका खासगी बसला आग लागून ती जळून खाक झाली.

आग लागलेली बस मुंबईहून मालवणला जात होती. रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी घाटात बसला आग लागली, आग लागली तेव्हा मध्यरात्रीची ही घटना घडली आणि काही प्रवाशांना झोपही लागली होती.

Mumbai News Private bus burnt near Kashedi

आग लागली तेव्हा बसमध्ये होते सुमारे ४५ प्रवासी!

गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणवासीयांची गावी जाण्याची एकीकडे लगबग सुरु असून सर्व बसेस आणि रेल्वे खचाखच भरलेल्या आहेत. अशा स्थितीत खासगी वाहतूकही कोकणात सुरु आहे, त्यात एका खासगी लक्झरी बससोबत मध्यरात्री आग लागल्याची दुर्घटना घडली. ज्यावेळी आग लागली तेव्हा तब्बल ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत होते.

कशी लागली आग?

प्राप्त माहितीनुसार, बसला आग कशी लागली याचे नेमके कारण कळलेले नाही; मात्र टायर फुटून आग लागली असावी, अशी प्राथमिक माहिती आहे. आगीचं वृत्त कळताच खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या अपघातात संपूर्ण बस आणि प्रवाशांचं सामान जळून खाक झालं आहे.

चालकाचे प्रसंगावधान..

आगीच्या घटनेनंतर चालकाने प्रसंगावधान राखले आणि आग लागल्याचे लक्षात येताच सर्व प्रवाशांना खाली उतरवलं. त्यामुळे मोठी प्राणहाणी टळली. या घटनेने बसमधील प्रवाशांना आपुले मरण पाहिल्या म्याँ डोळा अशीच अनुभुती आली. ही खासगी बस मुंबईवरून मालवणला जात होती असे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

जीव वाचले, बसमधील साहित्य खाक

बस पहाटे कशेडी बोगदा भागातून जात होती, त्यावेळी टायर प्रचंड गरम झालेले होते, टायरने एकाएकी पेट घेतला आणि आग पसरत होती, ही बाब चालकाच्या लक्षा येताच
आगीची घटना घडल्यानंतर प्रवाशांना पटापट खाली उतरवण्यात आले. या दरम्यान सामान मात्र जळाल्याचे वृत्त आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+